वयाच्या 65 व्या वर्षी संजय दत्तने केलं चौथ्यांदा लग्न? व्हिडीओ पाहून चाहते थक्क!
अभिनेता संजय दत्तने वयाच्या 65 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांमागचं कारण म्हणजे संजूबाबाचा सात फेरे घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोल आला आहे. यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेता संजय दत्तचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो अग्निभोवती सात फेरे घेताना दिसतोय. त्यामुळे संजू बाबाने वयाच्या 65 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न केलं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. खरंतर हा व्हिडीओ संजय दत्तच्या लग्नाच्या 16 व्या वाढदिवसाचा आहे. 9 ऑक्टोबर रोजी संजय आणि त्याची पत्नी मान्यता यांच्या लग्नाला 16 वर्षे पूर्ण झाली. या खास दिनानिमित्त दोघांनी पुन्हा एकदा अग्नीला साक्ष मानून सात फेरे घेतले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये संजय दत्तने भगव्या रंगाचा धोती-कुर्ता घातल्याचं दिसून येत आहे. कपाळावर त्याने टिळा लावला आहे. तर मान्यताने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. मान्यताने तिच्या डोक्यावर दुप्पटा घेतला आहे. संजय आणि मान्यता दोघं मिळून अग्नीच्या भोवती फिरत आहेत. लग्नाच्या वेळी ज्याप्रकारे सात फेरे घेतले जातात, तेच आता संजय दत्त आणि मान्यताने पुन्हा एकदा घेतले आहेत.
View this post on Instagram
संजय दत्तने तीन लग्न केले आहेत आणि मान्यता ही त्याची तिसरी पत्नी आहे. या दोघांनी 2008 मध्ये गोव्यात लग्न केलं होतं. त्याआधी संजूबाबाने 1998 मध्ये रिया पिल्लईशी दुसरं लग्न केलं होतं. 2008 मध्ये हो दोघं विभक्त झाले. रिया ही एअरहॉस्टेस आणि मॉडेल होती. संजय दत्तने ऋचा शर्माशी पहिलं लग्न केलं होतं. 1987 मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. ऋचा आणि संजय यांना एक मुलगीसुद्धा आहे. त्रिशला दत्त असं तिचं नाव आहे.
1996 मध्ये ऋचा शर्माचं ब्रेन ट्युमरने निधन झालं होतं. त्यानंतर संजय दत्तने 1998 मध्ये रियाशी गुपचूप लग्न केलं होतं. हे लग्न 2005 पर्यंत टिकलं होतं. तर 2008 मध्ये दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. मान्यता आणि संजय यांनी त्याच वर्षी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव शाहरान आणि मुलीचं नाव इकरा दत्त असं आहे.