संजय दत्त याला तुरुंगात मिळत होती विशेष सुविधा? माजी अधिकाऱ्याकडून सत्य समोर

Sanjay Dutt Jail : मुंबईत साखळी बॉम्बस्फोटात संजय दत्त याचा हात, तुरुंगात संजूबाबाला मिळत होती विशेष सुविधा? माजी अधिकाऱ्याकडून सत्य अखेर समोर आलंच... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय दत्त याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...

संजय दत्त याला तुरुंगात मिळत होती विशेष सुविधा? माजी अधिकाऱ्याकडून सत्य समोर
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 1:44 PM

मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका देखील बजावली. पण संजूबाबा त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत राहिला. आजही संजूबाबा आणि त्याचे वाद… कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना संजूबाबा याच्यावर फार मोठे आरोप करण्यात आले. ज्यामुळे अभिनेत्याला (Sanjay Dutt Jail) तुरुंगाची देखील हवा खावी लागली.

नुकताच, एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने अभिनेत्याने तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजूबाबा याच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटात 257 जणांनी आपले प्राण गमावले, तर 713 जण गंभीर जखमी झाले.

साखळी बॉम्बस्फोटनंतर तपासादरम्यान, दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनीस इब्राहिम, टायगर मेमन आणि अबू सालेम यांची नावे पुढे आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हल्ल्यात संजय दत्त याचं नाव समोर आल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. म्हणून संजय दत्त याला अटक करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, तुरुंगात संजय दत्त याला विशेष सुविधा दिल्या जात असल्याच्या दावा करण्यात आल्या होत्या. यावर मोठं वक्तव्य करत माजी आयपीएस अधिकारी मीरण चड्ढा बोरवणकर यांनी करण्यात आलेले दावे फेटाळले आहेत. ते म्हणाले, ‘तुरुंगात संजय दत्त याची सर्वांसोबत वागणूक चांगली होती… ‘

माजी आयपीएस अधिकारी पुढे म्हणाले, ‘पॅरोल आणि फर्लो कैद्याच्या तुरुंगातील वागणुकीवर अवलंबून आहे. जर तुरुंगात संजय याची वागणूक चांगली नसती तर कधीच त्याला पॅरोलची परवानगी दिली नसती. संजय तुरुंगात काय करायचा. तुरुंगात आपली वागणूक चांगली आहे. हे देखील संजय याला कळलं होतं…’

रिपोर्टनुसार, संजय दत्त याला आर्थर रोड तुरुंगातून पुण्यातील येरवडा तुरुंगात नेण्यात येणार होतं. पण तेव्हा अभिनेता घाबरत होता. कारण कोणी योजना करुन आपला एन्काउंटर करेल याची भीती संजय दत्त याच्या मनात होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय दत्त याची चर्चा रंगली.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.