व्हिस्की ब्रँडच्या दुनियेत संजूबाबाचा बोलबाला, 4 महिन्यात लाखो बाटल्या विकल्या, कमावले इतके कोटी
Sanjay Dutt Whiskey Brand: 'या' व्हिस्की ब्रँडमुळे संजूबाबा झाला मालामाल... 4 महिन्यात विकल्या इतक्या बाटल्या आणि कमावले कोट्यवधी..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजूबाबाच्या व्हिस्की ब्रँडची चर्चा...
Sanjay Dutt Whiskey Brand: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता संजय दत्त याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण संजूबाबा फक्त सिनेमांमध्ये काम करत नाही तर, उद्योग क्षेत्रात देखील संजूबाबा सक्रिय आहे. अभिनेत्याने गेल्या वर्षी दारु विकण्याचा व्यवसाय सुरु केला. अभिनेत्याचा स्वतःचा एक व्हिस्की ब्रँड आहे. संजूबाबाच्या व्हिस्कीचं नाव ‘द ग्लेनवॉक’ असं आहे. हा ब्रँड कार्टेल आणि ब्रदर्सने सुरू केला आहे आणि संजय दत्तच्या लोकप्रियतेमुळे तो बाजारात अधिकाधिक लोकप्रिय झाला आहे.
संजूबाबाच्या व्हिस्की ब्रँडचं दमदार यश…
संजय दत्तच्या व्हिस्की ब्रँड “द ग्लेनवॉक” ला बाजारात आणल्यानंतर लगेचच मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी पहिल्या चार महिन्यांमध्ये “द ग्लेनवॉक” च्या 1,20,000 बाटल्या विकल्या गेल्या. मुंबई, पुणे आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये ब्रँडची सर्वाधिक विक्री झाली आहे. या कालावधीत ब्रँडने जवळपास 19.20 कोटी रुपयांची कमाई केली.
View this post on Instagram
पुढील आर्थिक वर्षापर्यंत 2.8 दशलक्ष बाटल्या विकण्याचे संजय दत्तचे लक्ष्य आहे, जे या ब्रँडसाठी मोठे आणि आव्हानात्मक लक्ष्य आहे. द ग्लेनवॉक व्हिस्कीच्या किंमतीबद्दल सांगायचं झालं तर, एका बोटलची किंमत जवळपास 1,550 रुपये ते 1,600 पर्यंत आहे. संजय दत्तची लोकप्रियता आणि प्रसिद्धीमुळे ब्रँड मोठा फायदा झाला आहे.
सांगायचं झालं तर, संजूबाबा फक्त यशस्वी अभिनेता नाही तर, स्मार्ट उद्योजक देखील आहे. त्याच्या नवीन व्हिस्की ब्रँडचे लॉन्चिंग हे सिद्ध करत आहे की बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या भविष्यासाठी चित्रपटांसह उद्योग जगात गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
View this post on Instagram
संजय दत्तच्या आधी, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते डॅनी डेन्झोंगपा यांनी देखील दारूच्या व्यवसायात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यांच्या स्वतःच्या बिअर ब्रँडचं नाव “युक्सोम ब्रुअरीज” असं आहे.