Duniyadari | “..अन् त्यावेळी मी गाडीतच ढसाढसा रडू लागलो”; ‘दुनियादारी’च्या दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

'दुनियादारी' हा संजय जाधव यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यावेळी या चित्रपटाला बऱ्याच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. नितेश राणे यांच्या 'महाराष्ट्र कलानिधी' या संस्थेकडून चित्रपटाला मोठी मदत झाली होती. सुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी' या नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता.

Duniyadari | ..अन् त्यावेळी मी गाडीतच ढसाढसा रडू लागलो; 'दुनियादारी'च्या दिग्दर्शकाने सांगितला किस्सा
दुनियादारीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 8:59 AM

मुंबई | 19 जुलै 2023 : मराठी चित्रपटसृष्टीतील मल्टिस्टारर चित्रपट ‘दुनियादारी’ने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचले होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल होते. 270 थिएटरमध्ये दररोज 710 शोज आणि दर आठवड्याला 5 हजारांहून अधिक शोजचा या चित्रपटाचा विक्रम आहे. स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर यांसोबतच इतर बऱ्याच कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त चित्रपटाची टीम ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात पोहोचली होती. या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांनी आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी बऱ्याच आठवणी आणि किस्से सांगितले.

19 जुलै 2013 रोजी दुनियादारी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम पुण्याला जात होती आणि त्यांना सतत डिस्ट्रिब्युटर्सचे फोन येत होते. सगळे शोज हाऊसफुल होते असं कळताच टीमने एकच जल्लोष केला. त्यावेळचा हा किस्सा संजय जाधव यांनी सांगितला. “आम्ही पुण्याला जात होतो, तेव्हा मी गाडी थांबवून अक्षरश: रडायला लागलो. मी गाडी बाजूला थांबवली आणि जवळपास 15 मिनिटं मी ढसाढसा रडलो”, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पुढे स्वप्निल जोशी म्हणाला, “आम्हाला एका थिएटर मालकाचाही फोन आला. तो म्हणाला की माझ्या बायकोला द्यायलाही तिकिट नाही, इतकं थिएटर फुल झालंय. माझं स्वत:चं थिएटर असून मला बायकोला तिकिट देता येत नाहीये. इतकंच काय तर तिला पायऱ्यांवर बसवायलाही जागा नाही.”

‘दुनियादारी’ हा संजय जाधव यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यावेळी या चित्रपटाला बऱ्याच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. नितेश राणे यांच्या ‘महाराष्ट्र कलानिधी’ या संस्थेकडून चित्रपटाला मोठी मदत झाली होती. सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. तरुणाई, कॉलेज आणि त्यांचं आयुष्य यांच्याशी निगडीत चित्रपटाची कथा खूप गाजली. दुनियादारी या चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. तरुणाईची कथा चित्रपटात असल्याने थिएटरमध्ये तरुण वर्गाने मोठी गर्दी केली होती.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.