Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वांत मोठ्या प्रोजेक्टची घोषणा; रणबीर-आलिया-विकीला एकत्र पाहताच चाहते म्हणाले ‘ब्लॉकबस्टर’

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी प्रोजेक्टची नुकतीच घोषणा झाली आहे. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल या तिघांच्या मुख्य भूमिका आहेत. 'लव्ह अँड वॉर' असं या चित्रपटाचं नाव असून पुढच्या वर्षी ख्रिसमसला तो प्रदर्शित होणार आहे.

सर्वांत मोठ्या प्रोजेक्टची घोषणा; रणबीर-आलिया-विकीला एकत्र पाहताच चाहते म्हणाले 'ब्लॉकबस्टर'
Bhansali announces film Love and WarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 8:27 AM

मुंबई : 25 जानेवारी 2024 | बॉलिवूडमधल्या सर्वांत मोठ्या प्रोजेक्टची नुकतीच घोषणा झाली आहे. दिग्दर्शिक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या बिग बजेट आणि ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारख्या त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता भन्साळींनी त्यांच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘लव्ह अँड वॉर’ असं या चित्रपटाचं नाव असून त्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे त्रिकूट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विकी आणि आलिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. या चित्रपटाची कथा काय असेल याविषयीची अधिक माहिती अद्याप समोर आली नाही.

रणबीर-आलिया आणि विकीच्या या चित्रपटाची शूटिंग येत्या काही दिवसांत सुरू होईल. हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरने 2007 मध्ये भन्साळींच्या ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी 2005 मध्ये रणबीरने ‘ब्लॅक’ या भन्साळींच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्याचप्रमाणे भन्साळी आणि विकी कौशल यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट असेल. आलियासोबत त्यांनी 2022 मध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी काम केलं होतं. या चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला.

हे सुद्धा वाचा

‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि आलियासुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. भन्साळींचा चित्रपट आणि त्यातील स्टारकास्ट हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. म्हणूनच ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आलिया आणि विकीच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. या पिढीतील सर्वांत प्रतिभावान कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत, असं एकाने म्हटलंय. तर ही कास्ट म्हणजे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार, असा विश्वास दुसऱ्या युजरने व्यक्त केला आहे.

अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान हे तिघं एकत्र दिसले होते. यावेळी विकी कौशलची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा त्यांच्यासोबत होती.

संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल.
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल..
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल...
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले.
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?.
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.