मुंबई | 2 7 ऑगस्ट 2023 : 25 ऑगस्ट रोजी अभिनेते सनी देओल यांच्या बंगल्याची लिलावाची प्रक्रिया पार पडणार होती. 56 कोटी रुपये वसूल करण्यासाठी सनी देओल यांचा बंगला बँक ऑफ बरोडाने ब्लॉकवर ठेवला होता. पण अभिनेते भाजप खासदार सनी देओल यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्याच्या लिलावाची नोटीस काही तासात मागे घेण्यात आली. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सनी दोओल यांना वाचवलं मात्र नितीन देसाई यांना वाचवण्यात आलं नाही, त्यांना स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं…’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप सरकरावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘अभिनेते सनी देओल यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बरोडा करणार होती. जवळपास ६० कोटी रुपयांचं कर्ज सनी देओल फेडू शकले नाहीत. यासाठी बँकेने लिलावाची घोषणा केली. लोकांना बोलावलं. आमचं सनी देओल यांच्यासोबत काही वैर नाही. ते एक उत्तम अभिनेते आणि व्यक्ती आहे, पण २४ तासाl लिलाव थांबवण्यात आला. दिल्लीतून संदेश आला आणि सनी देओल यांचं घर वाचवण्यात आलं. पण आमच्या नितीन देसाई यांना वाचवण्यात आलं नाही. स्वतःचा स्टुडिओ वाचवण्यासाठी देसाई प्रयत्न करत होते. त्यांना देखील कर्ज फेडायचं होतं.’
पुढे संजय राऊत म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीत गेले होते. सर्व भाजप नेते, मंत्र्यांना भेटले. पण नितीन देसाई यांना न्याय मिळाला नाही. त्यांचं स्टुडिओ वाचवण्यात आलं नाही आणि त्यांचे प्राण देखील वाचवण्यात आले नाही. ४ – ५ हजार कोटी रुपयांचे घोटाळे बँकांना बुडवत असल्याचं समोर येत आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. भाजपाच्या संबंधीत लोकांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. पण नितीन देसाई यांच्यासंबंधी असा निर्णय घेण्यात आला नाही. त्यांना स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं… हेच सध्या देशात सुरु आहे.’ असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे…
सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये शेवटचा श्वास घेतला. सध्या पोलीस त्यांच्या निधनाची चौकशी करत आहेत. दरम्यान, नितीन देसाई मृत्यू प्रकरणामधील आरोपी रशेस शाहा आणि इतरांचे फोन बंद असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यासोबतच आरोपी घरात आणि कार्यालयातही नसल्याचं समोर आलं आहे.