मामाला वडील म्हणते प्रसिद्ध अभिनेत्री लेक, मुलगी लहान असताना…, नक्की काय आहे प्रकरण?

Actress life with Daughter | लग्नानंतर अभिनेत्रीने चाहत्यांना दिले कपल गोल्स, पण मुलगी झाल्यानंतर पतीने सोडली साथ, अभिनेत्रीची लेक आता मामालाच बोलते बाबा..., घटस्फोटानंतर पत्नी आणि मुलीकडे त्याने वळून देखील पाहिलं नाही... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

मामाला वडील म्हणते प्रसिद्ध अभिनेत्री लेक, मुलगी लहान असताना..., नक्की काय आहे प्रकरण?
संजीदा शेख
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 1:21 PM

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना अभिनय क्षेत्रात यश मिळालं. पण खासगी आयुष्यात अभिनेत्रींना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. आता देखील अशा अभिनेत्रीची चर्चा रंगची जिची लेक मामालाच बाबा म्हणून हाक मारते. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्री संजीदा शेख आहे. संजीदा सध्या ‘सिंगल मदर’ म्हणून आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीने अभिनेता अमिर अली याच्यासोबत लग्न केलं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला अमिर आणि संजीदा यांचा 2022 मध्ये घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर अभिनेत्री लेक आयरा आणि भाऊ अनस अब्दुल रहीम शेख याच्यासोबत राहात आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री भाऊ आणि लेकीमध्ये असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. संजीदा हिची लेक आता मामालाच वडील मानते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत संजीदा हिने लेकीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे .

अभिनेत्री म्हणाली, ‘माझी प्रत्येक व्हिडीओ पाहात असते. आजची पिढी प्रचंड स्मार्ट आहे. माझ्या लेकीला प्रत्येक वस्तूचा वापर कसा करायचा माहिती आहे. पण तिला नकारात्मक गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. माझा भाऊ घरातीली स्ट्रॉग्न पिलर आहे. माझी मुलगी त्याला ‘पा’ म्हणून हाक मारते.’

‘मी, माझी मुलगी, आई आणि भाऊ आम्ही एकत्र राहातो. माझा भाऊ आमच्या सर्वांसाठी वडिलांच्या जागेवर आहे. तोच आमची तिघींची प्रचंड काळजी घेतो. माझी लेक तर कायम त्याच्यासोबत असते.’ सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर आमिर कधीच लेकीला भेटला नाही.

आमिर आणि संजीदा यांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला. त्यांच्या नात्याचा मुलीच्या आयुष्यावर कोणता परिणाम नको… याची काळजी दोघे घेत असतात. संजीदा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

संजीदा हिने अनेक मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.