‘अन् मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही लवकर सुटेल..’; संकर्षण कऱ्हाडेची राजकीय कविता एकदा ऐकाच..

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं राजकीय कविता लिहिली असून नुकत्यात झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात त्याने ती बोलून दाखवली. पांडुरंग आणि राजकारण या दोन आवडीच्या विषयांवर त्याने ही कविता लिहिली आहे.

'अन् मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही लवकर सुटेल..'; संकर्षण कऱ्हाडेची राजकीय कविता एकदा ऐकाच..
Sankarshan KarhadeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 11:25 AM

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अन् कविता हे समीकरण म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. नुकत्याच आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात संकर्षणने त्याची नवी राजकीय कविता वाचून दाखवली. “राजकारण आणि पांडुरंग हे दोन माझे आवडीचे विषय आहेत. त्या विषयाला अनुसरून मी काहीतरी लिहिलंय,” असं त्याने म्हटलंय. त्याच्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील आगामी निवडणूक, राजकीय परिस्थिती, प्रचारसभा या सर्वांचा उल्लेख करत त्याने ही कविता लिहिली आहे.

संकर्षण कऱ्हाडेची कविता-

“सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरून पहावं..

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत, तू अर्ज भरून पहावं.. मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं

मग ना पावसातल्या सभा, ना प्रचाराचा घाम.. तुझे स्टार प्रचारक देवा ग्यानबा तुकाराम..

प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील.. बॅनर बघून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील..

सगळं सुखाचं होईल तेव्हा विपरित काही घडणार नाही पांडुरंगा.. आणि तू सगळ्यांचा असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही..

तुझा कुणीच विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटंल.. अजून तरी पांडुरंगा, तुझा कुणीच विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटंल…

अन् मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे कोडंही लवकर सुटंल..

पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील आणि मुख्य म्हणजे भल्याभल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील…

सगळ्यांत मोठा निर्णय पांडुरंगा असा घे.. कायद्यासोबत गृहखातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे..

मग काय टाक देवा कोण कायदा हातात घेईल.. अरे एका नजरेत अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल..

लाडक्या भावांवरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पहावं… (तुम्हाला वेगळा शब्द ऐकायची सवय आहे, माझ्या कवितेत वेगळं लिहिलंय) त्या

मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं..

आणि साक्षरतेचे विठ्ठला काय दिवस येतील.. बुद्धिला वैभव आणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षणमंत्री होतील..

अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वत: खाली बुडलं.. जे सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं..

त्या तुकोबांच्या हाती दे हिशेबाच्या वह्या आणि अर्थमंत्री म्हणून घे ताबडतोब त्यांच्या सह्या..

एकदम झाला आवाज हो.. लखलख वीज कडाडली. वीटेवरची सावली माऊली माझ्यावरती चिडली..

काय लावली केव्हापासूनची तुझी ही बडबड हे.. पांडुरंग म्हणाला.. काय लावली केव्हापासूनची तुझी ही बडबड आहे..

हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे..

या थोरांना मंत्री करून मला सीएम करतोस हो रे… राजकारणात त्यांच्या नावाचा होतो तेवढा वापर पुरे..

राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोयस म्हणून केव्हाचा ऐकतोय…पण ऐक आता एक उपाय मी मन लावून सांगतोय..

माऊलीच्या रुपातला विठ्ठल बापासारखा वागला आणि जबाबदारीनं राष्ट्रासाठी पुढं बोलू लागला..

मला म्हणाला गाथा, ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता? अन् मग कसं काय रे त्या जयंत्यांना तुम्ही डीजे लावून नाचता?

या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलंत.. डोक्यावरती घेतलंत पण डोक्यात नाही घातलं..

प्रत्येकात तुका, शिवाजी आहे.. जर विचारांचा घेतला वसा..

सुराज्यासाठीच काम करा मग कुणीही खुर्चीत बसा..

आणि कर्तृत्त्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड… आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड..

आम्ही सगळे पाठिशी आहोत तुम्ही खुशाल राहा.. अरे समोर महाराष्ट्र उभा आहे.. त्याच्यात पांडुरंग पाहा..”

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.