माझ्या भगव्या रक्ताचा कल्लोळ…, ‘छावा’ सिनेमाचं यश, संतोष जुवेकरची भावूक पोस्ट
Santosh Juvekar post about Chhaava: छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा....‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर डोळ्यात येणारं पाणी, संतोष जुवेकर भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला, 'माझ्या भगव्या रक्ताचा कल्लोळ...', अभिनेत्याची लक्षवेधी पोस्ट चर्चेत

Santosh Juvekar post about Chhaava: ‘काश मेरी एक औलाद संभाजी जैसी होती तो हिंदुस्तान तो क्या पूरी दुनिया मेरी होती…’, आपल्या पराक्रमाने शत्रूचं देखील मन जिंकणारे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा ‘छावा’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केला आहे. 14 फेब्रुवारी रोजी ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि सर्व चित्रपटगृह हाऊसफुल झाले. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी दमदार भूमिका साकरली. तर विकीने महाराजांची साकारलेल्या भूमिकेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं.
सर्वत्र ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु असताना अभिनेता संतोष जुवेकरची लक्षवेधी सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. संतोष जुवेकरने ‘छावा’मध्ये रायाजी हे पात्र साकारले आहे. संतोषच्या भूमिकेचं देखील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
View this post on Instagram
संतोषने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत सिनेमाच्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे सांगितले आहेत दोन दिवसांत भारतात 72.4 कोटी कमावले आहेत. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटींची कमाई केली आहे.
स्वतःचा फोटो पोस्ट करत संतोष याने कॅप्शनमध्ये, ‘मला ह्या आकड्या पेक्षा प्रत्येक सिनेमागृहातल्या माझ्या मायबाप प्रेक्षकांचा आकडा बघायला आणि ऎकायला आवडेल… माझ्या धाकल्या धनिना बघायला आणि समजून घ्यायला येणाऱ्या माझ्या भगव्या रक्ताचा कल्लोळ झाला पाहिजे… जय भवानी जय शिवराय जय संभाजी राजे… ‘ असं लिहिलं आहे.
अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘उत्कृष्ट अभिनय केला भाऊ. जगदंब….जगदंब….जगदंब’’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तू चित्रपटात आहेस हीच आम्हाला भाग्याची आणि गौरवाची गोष्ट आहे…’ सध्या संतोषची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. यांच्यासोबत विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहीत पाठक यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आाहे.