Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांनी मला जवळ घेतलं अन्…’ अभिनेत्रीने सांगितला संतोष जुवेकरसह काम करण्याचा अनुभव

मराठी मालिकेतील एका अभिनेत्रीने संतोष जुवेकरसह काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तिने संतोषबद्दल कामन करताना तिला काय अनुभव आले तसेच शूटवेळी संतोषचा सेटवरचा वावर कसा असायचा? या सर्व गोष्टींबद्दल सांगितलं आहे.

'त्यांनी मला जवळ घेतलं अन्...' अभिनेत्रीने सांगितला संतोष जुवेकरसह काम करण्याचा अनुभव
Santosh Juvekar Praised by Actress Kanchi Shinde, Positive Energy & On-Set ExperienceImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2025 | 6:10 PM

छावा चित्रपटानंतर अभिनेता संतोष जुवेकर चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. पण सध्या एका अभिनेत्रीने केलेल्या त्याच्या कौतुकामुळेही त्याची चर्चा होत आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ मध्ये काही दिवसांपासून नवा अध्याय सुरू झाला. मालिकेतील इंदू आता मोठी झालेली दाखवण्यात आली आहे. मोठी इंदू नव्या आव्हानांचा सामना करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कांची शिंदेने मोठी इंद्रायणीची भूमिका साकारली आहे. याच कांचीने संतोष जुवेकरसह काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

संतोष जुवेकरबद्दल अभिनेत्री काय म्हणाली?

कांची शिंदेला एका मुलाखतीत संतोष जुवेकरबद्दल विचारण्यात आलं , जसं की तो आता मालिकेत पुढे दिसणार आहे की नाही?. तेव्हा कांची म्हणाली, “मालिकेत ते पुन्हा दिसणार आहेत की नाही हे मी सांगू शकणार नाही. पण, त्यांची ऊर्जा खूप सकारात्मक आहे. एकतर विठ्ठूरायला रिप्रेझेंट करणार पात्र हे कसं असू शकतं? हे त्यांच्याकडे पाहून समजतं. त्यांच्या जागी कोणी दुसरं असतं तर अवघड झालं असतं. पण, त्यांच्या चेहऱ्यामध्ये इतकं प्रेम आहे, इतकी आपुलकी आहे. त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये एक तेज आहे. त्यांनी इतकं काम केलं आहे. इतकी पात्र त्यांनी साकारली आहेत. म्हणून कुठेतरी सकारात्मक कामाचा ऑरा त्याच्यांत जाणवतो.”असं म्हणत तिने संतोषचे तोंडभरून कौतुक केलं आहे.

“संतोष जुवेकर आजूबाजूला असतात तेव्हा एक आनंदी वातावरण असतं”

कांची पुढे म्हणाली की, “जेव्हा संतोष जुवेकर आजूबाजूला असतात तेव्हा एक आनंदी वातावरण असतं. मजा, मस्ती सुरू असते. कोणाला कामाचा लोढ नसतो. त्यामुळे छान काम होतं आणि वेळेत काम होतं. ते शाबासकीची थापही देतात. जाता जाता मला असं झालं होतं की, खूप मोठा माणूस आहे. खूप मोठे कलावंत आहेत. पण, त्यांनी जाताना मला जवळ घेतलं आणि म्हणाले, लढ आता. तुझी वेळ आहे. असं म्हणून ते गेले. आणि हे कायम माझ्या लक्षात राहिलं. विनोद दादांनंतर त्यांनी दिलेली थाप ही प्रोत्साहन देणारी पहिली थाप होती,” असं कांची शिंदेने म्हटलं आहे.

दरम्यान, कांची शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कांचीने ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत चमकीची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती. कांची सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ती लावणी वर्कशॉप घेते. कांचीने अनेक लावणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.