मुंबई | 21 जुलै 2023 : एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल किंवा जीवनात आलेल्या काही प्रसंगांमुळे डिप्रेशनचा सामना करावा लागतो. कोणत्याच गोष्टीत मन रमत नाही, भूक लागत नाही.. अशा अनेक गोष्टींचा सामना डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना करावा लागतो. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी देखील डिप्रेशनचा सामना केला आहे. शिवाय त्यांनी डिप्रेशन अवस्थेबद्दल देखील सांगितलं आहे. आता देखील एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने डिप्रेशनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला धुम्रपानाचं व्यसन देखील लागलं होतं. धुम्रपानाचं व्यसन लागल्यामुळे अभिनेत्री त्रस्त होती. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रूपल त्यागी आहे.
‘सपने सुहाने लडकपन के’ मालिकेत गुंजन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपल त्यागी ‘बिग बॉस ९’ मध्ये देखील दिसली होती. पण ‘बिग बॉस’नंतर अभिनेत्रीने मोठा ब्रेक घेतला. रुपल क्लिनिकल डिप्रेशनमध्ये गेली होती. नैराश्य आनुवांशिकरित्या असतं पण रुपलला तिच्या वाईट जीवनशैलीमुळे डिप्रेशनचा सामना करावा लागला होता.
एका मुलाखतीत रुपल हिने मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री म्हणाली, ‘मी १८ तास शुटिंग करायची. पूर्ण दिवस प्रवासात जायचा… स्वतःवर मी बिलकूल लक्ष देत नव्हती. आराम आणि झोप तर मी विसरलीच होती. मला स्मीकिंगची वाईट सवय लागली होती. मला काळलं होतं की मला लागलेली सवय किती वाईट आहे आणि यातून मला बाहेर पडायचं होतं….’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
२०१५ मध्ये बिग बाॉसमध्ये अभिनेत्री दिसली होती. त्यानंतर रुपल हिला डिप्रेशनचा सामना करावा लागला. रुपल प्रचंड उत्साही आणि आनंदी असायची पण काही दिवसांनंतर तिच्या लक्षात येवू लागलं की आपण आता खचत आहोत. अशात रुपल हिला डिप्रेशनबद्दल कळलं. अशात अभिनेत्रीने स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःवर लक्ष देण्यास सुरुवात केली. आता रुपल आनंदी आयुष्य जगत आहे.
रुपल आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार मोठी आहे. रुपल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रुपल तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. ‘सपने सुहाने लडकपन के’ मालिकेत गुंजन ही भूमिका साकारणाऱ्या रुपल हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती.