Sara Ali Khan | एअरपोर्टवर महिलेकडून सारा अली खानला चुकीच्या पद्धतीने स्पर्श; भडकले चाहते

अनेकदा सेलिब्रिटींच्या अहंकारावरून, त्यांच्या वागण्यावरून ट्रोल केलं जातं. मात्र जेव्हा चाहतेच सेलिब्रिटीसोबत असे वागतात, तेव्हा काय म्हणायचं, असा सवाल काही नेटकरी करत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Sara Ali Khan | एअरपोर्टवर महिलेकडून सारा अली खानला चुकीच्या पद्धतीने स्पर्श; भडकले चाहते
Sara Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 2:50 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवूडमधल्या इतर सर्व स्टारकिड्सपेक्ष वेगळी मानली जाते. पापाराझी असो किंवा चाहते.. सर्वांसमोर साराचा विनम्र स्वभाव नेहमी मन जिंकून घेतं. फोटोग्राफर्ससमोरही ती नेहमीच हात जोडून अभिवादन करते. त्यामुळे तिला स्टारकिड किंवा सैफ अली खानची मुलगी असल्याचा गर्व नाही, असं चाहते म्हणतात. साराचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एअरपोर्टवरून बाहेर येताना चाहत्यांसोबत सेल्फी क्लिक करताना आणि फोटोग्राफर्सना नमस्कार करताना दिसतेय. मात्र या व्हिडीओतील एका महिलेच्या कृत्याने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

एअरपोर्टमधून बाहेर चालत येत असताना काही चाहत्यांनी साराभोवती घोळका केला आहे. त्यापैकी काहीजण तिच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी आतूर आहेत. सारासुद्धा हसत त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करताना दिसतेय. त्याचवेळी एक बाई अचानक समोरून येते आणि ती साराशी हात मिळवते. सारा तिच्यासोबतही हसत हात मिळवते. मात्र त्यानंतर जेव्हा ती महिला सारासमोरून जाते, तेव्हा तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करते. यावेळी ती क्षणभरासाठी दचकते आणि पुन्हा पुढे चालू लागते. हाच व्हिडीओ स्लो मोशनमध्येही स्पष्टपणे पहायला मिळतोय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by OCD TIMES (@ocdtimes)

साराचा हा व्हिडीओ जुना असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. अनेकदा सेलिब्रिटींच्या अहंकारावरून, त्यांच्या वागण्यावरून ट्रोल केलं जातं. मात्र जेव्हा चाहतेच सेलिब्रिटीसोबत असे वागतात, तेव्हा काय म्हणायचं, असा सवाल काही नेटकरी करत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हे काळा जादू असू शकतं’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘हे खूप चुकीचं आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तिने साराचे केस खेचले’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

साराने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने सिम्बा, लव्ह आज कल 2, अतरंगी रे, गॅसलाइट, जरा हटके जरा बचके यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. “एक अभिनेत्री म्हणून मला दररोज भरपूर काही शिकायला मिळतं आणि हाच प्रवास माझ्या प्रगतीसाठी उपयोगी आहे. मी नेहमीच अशा गोष्टींमधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. पण मीसुद्धा काही चुका केल्या आहेत, हे मान्य करते,” असं ती एका मुलाखतीत म्हणाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.