Sara Ali Khan ते श्रद्धा कपूर हिच्यापर्यंत, ‘या’ अभिनेत्रींकडे आहेत अत्यंत स्वस्त कार!

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टारकिड्स कायम त्यांच्या रॉयल लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. पण काही सेलिब्रिटी बक्कळ पैसा असाताना देखील वापरतात स्वस्त कार, सेलिब्रिटींच्या कार कलेक्शनची सर्वत्र चर्चा...

Sara Ali Khan ते श्रद्धा कपूर हिच्यापर्यंत, 'या' अभिनेत्रींकडे आहेत अत्यंत स्वस्त कार!
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 10:54 AM

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या रॉयल लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असतात. भव्य घर, महागड्या गाड्या, कोट्यवधींची संपत्ती.. इत्यादी गोष्टींमुळे सेलिब्रिटी चर्चेत असतात. एवढंच नाही तर, आता स्टारकिड्स देखील त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. महागडे कपडे, सतत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये कायम प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या मुलांना स्पॉट केलं जातं. तर दुसरीकडे काही स्टारकिड्स आणि अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्या त्यांच्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडच्या प्रत्येक सेलिब्रिटीकडे महागड्या गाड्या आहेत. पण काही स्टार असे देखील आहेत जे अत्यंत स्वस्त कार वापरतात. अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्याकडे देखील अत्यंत स्वस्त कार आहेत. तर काही अभिनेत्रींकडे मारुती ऑल्टो आणि स्विफ्ट यांसारख्या स्वस्त कार आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. श्रद्धा स्थानिक प्रवासासाठी आणि दैनंदिन कामांसाठी मारुती ब्रेझा किंवा मारुती सुझुकी स्विफ्ट कार देखील वापरते. मारुती स्विफ्ट ही तिच्या गॅरेजमधील सर्वात स्वस्त कार असून अभिनेत्रीकडे ब्रेझा कार देखील आहे. श्रद्धाला डीझल ब्रेजा आणि मारुती स्विफ्ट हॅचबॅक या दोन्ही कारसोबत स्पॉट करण्यात आलं आहे.

shraddha kapoor

हे सुद्धा वाचा

श्रद्धा कपूर हिच्याकडे असलेल्या महागड्या कारबद्दल सांगायचं झालं तर, तिच्याकडे मर्सिडीज-बेंझ जीएलए 200 डी, टोयोटा फॉर्च्युनर, मर्सिडीज-बेंझ एमएल 250 आणि इतर अनेक गाड्या देखील आहेत. श्रद्धा कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते.

सारा अली खान हिच्याकडे असलेल्या स्वस्त कार

अभिनेता सैफ अली खान आणि राजघराण्यातील मुलगी सारा अली खान हिच्या गॅरेजमध्ये G 350d सारख्या कार आहेत. पण अभिनेत्री कायम Honda CR-V आणि जीप कंपासने प्रवास करताना दिसते. साराला काही दिवसांपूर्वी मारुती अल्टो 800 कारसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. पण आता कंपनीने मारुती अल्टो 800 कारची निर्मिती बंद केली आहे. सारा देखील रॉयल आयुष्य जगते.

Nushrat Bharucha हिच्याकडे असलेल्या स्वस्त कार

अभिनेत्री नुसरत भरुचा देखील कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीकडे कार कलेक्शन आहे. महिंद्रा थार ही भारतातील एक लोकप्रिय SUV आहो. महिंद्राने SUV ची RWD व्हर्जन देखील लॉन्च केला आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाकडे रॉकी बेज शेडची लाइफस्टाइल एसयूवी आहे. 4×4 महिंद्रा थार चालवणारी ती कदाचित इंडस्ट्रीतील एकमेव अभिनेत्री आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.