Sara Ali Khan | थेट इतक्या कोटींचे नवीन ऑफिस केले सारा अली खान हिने खरेदी, किंमत ऐकून बसेल धक्का

| Updated on: Jul 23, 2023 | 3:19 PM

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही तिचा चित्रपट जरा हटके जरा बचके हा रिलीज झाल्यापासून तूफान चर्चेत आहे. सारा अली खान हिच्या या चित्रपटाने मोठा धमाका करत मोठी कमाई केलीये. सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे.

Sara Ali Khan | थेट इतक्या कोटींचे नवीन ऑफिस केले सारा अली खान हिने खरेदी, किंमत ऐकून बसेल धक्का
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद हा मिळालाय. सारा अली खान हिच्यासोबत या चित्रपटामध्ये विकी काैशल (Vicky Kaishal) हा मुख्य भूमिकेत आहे आणि यांची जोडी हिट ठरलीये. जरा हटके जरा बचके या चित्रपटामध्ये धमाकेदार अभिनय करताना सारा अली खान ही दिसली आहे. विशेष म्हणजे यांच्या चित्रपटाने मोठी कमाई ही बाॅक्स आॅफिसवर केलीये. जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे (Movie) जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान आणि विकी काैशल हे दिसले होते.

सारा अली खान ही नुकताच अमरनाथ यात्रा करताना दिसली आहे. सारा अली खान हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या अमरनाथ यात्रेची एक झलक ही चाहत्यांना दाखवली आहे. सारा अली खान हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत सारा अली खान हिचे काैतुक देखील केले.

आता सारा अली खान हिच्याबद्दल एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. रिपोर्टनुसार सारा अली खान हिने मुंबईच्या एक अत्यंत महागड्या परिसरात ऑफिस खरेदी केले आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिचे हे ऑफिस अत्यंत खास असल्याचे देखील सांगितले जात आहे. या ऑफिससाठी सारा अली खान हिने तगडे पैसे मोजल्याचे देखील सांगितले जातंय.

2025 मध्ये सारा अली खान हिला या ऑफिसचा ताबा मिळणार असल्याचे रिपोर्टमध्ये आहे. सारा अली खान हिने खरेदी केलेल्या ऑफिसची किंमत ही 1.01 ते 1.46 कोटींपर्यंत असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान हिचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. सारा अली खान हिने ही मोठी गुंतवणूक केली आहे.

सारा अली खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी सारा अली खान ही आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना कायमच दिसते. सारा अली खान ही सोशल मीडियावर खास आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. सोशल मीडियावर सारा अली खान हिची मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.