Sara Ali Khan | सैफ अली खान याच्या लेकीने ओलांडल्या कंजूशपणाच्या सर्व मर्यादा, सारा अली खान एक टी बॅग चक्क

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. नुकताच सारा अली खान हिचा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सारा अली खान हिचा हा चित्रपट कमाईमध्ये धमाल करताना दिसत आहे. सारा अली खान ही तिच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते.

Sara Ali Khan | सैफ अली खान याच्या लेकीने ओलांडल्या कंजूशपणाच्या सर्व मर्यादा, सारा अली खान एक टी बॅग चक्क
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 2:55 PM

मुंबई : सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaushal) यांचा नुकताच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने ओपनिंग जबरदस्त केलीये. तीन दिवसांमध्ये सारा आणि विकी यांच्या चित्रपटाने 22 कोटींची कमाई बाॅक्स आॅफिसवर केलीये. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी काैशल हे दिसले होते. देशातील प्रत्येक ठिकाणी जाऊन जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे प्रमोशन हे सारा अली खान आणि विकी काैशल यांनी केले आहे. राजस्थानमध्ये तर जयपुर (Jaipur) शहरात फिरत थेट या दोघांनी प्रमोशन केले. सारा अली खान ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे.

सारा अली खान ही क्रिकेटर शुभमन गिल याला डेट करत असल्याच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. यांचे काही फोटोही व्हायरल झाले. मात्र, सारा अली खान किंवा शुभमन गिल यांच्यापैकी कोणीच त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाही. काही दिवसांपूर्वी सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.

सारा अली खान आणि विकी काैशल हे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये गेले होते. यावेळी सारा, विकी आणि कपिल शर्मा हे धमाल करताना दिसले. कपिल शर्मा याच्या शोमध्ये सारा अली खान हिने अत्यंत मोठा खुलासा हा केलाय. सारा अली खान ही बाॅलिवूड अभिनेत्रींमध्ये सर्वात जास्त कंजूस आहे.

सारा अली खान हिने सांगितले की, ती एका टी बॅगचा वापर फक्त एकदा करत नाही तर चार ते पाच वेळा एकच टी बॅग वापरते आणि मगच फेकून देते. सारा अली खान हिचे हे बोलणे ऐकल्यावर अनेकांना मोठा धक्का बसला. यावर कपिल शर्मा म्हणतो की, मग तर तू शूटिंग संपल्यानंतरही सेटवरून जेवण करून जात अशील, कारण घरचे अन्न वाचावे म्हणून.

सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यांच्या अफेअरच्या चर्चा सातत्याने रंगत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच यांचे ब्रेकअप झाल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. त्यानंतर सारा अली खान हिचे नाव शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.