Sara Ali Khan: सारा अली खानसोबत ‘मिस्ट्री मॅन’ आहे तरी कोण? फोटोवरून चर्चांना उधाण

साराने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं या 'मिस्ट्री मॅन'सोबत; चाहत्यांनी विचारलं 'कार्तिक कुठे आहे?'

Sara Ali Khan: सारा अली खानसोबत 'मिस्ट्री मॅन' आहे तरी कोण? फोटोवरून चर्चांना उधाण
Sara Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 11:17 AM

मुंबई: अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही जोडी ब्रेकअपनंतरही सतत चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सारा लंडनला फिरायला गेली. त्याचवेळी कार्तिकनेही लंडनमधील व्हेकेशनचे फोटो पोस्ट केल्याने हे दोघं एकत्र आहेत की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला. मात्र साराच्या नवीन फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोमध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत पहायला मिळतेय.

या फोटोमध्ये सारा आणि त्या मिस्ट्री मॅनने स्वॅगमध्ये पोझ दिला आहे. साराच्या पुढे उभ्या असलेल्या या व्यक्तीने काळ्या हुडीने आपला चेहरा झाकला आहे. या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हे सुद्धा वाचा

हा कार्तिक आर्यनसारखा दिसतोय, असं काहींनी म्हटलंय. तर कार्तिक दुसऱ्या मुलीला डेट करतोय. तर सारासोबत ही व्यक्ती कोण, असा प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला आहे. काहींनी तो साराचा भाऊ इब्राहिम खान असल्याचंही म्हटलंय.

‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात एकत्र काम करताना सारा आणि कार्तिक एकमेकांच्या प्रेमात पडले. काही महिने दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर कार्तिकचं नाव हृतिक रोशनची बहीण पश्मिना रोशनशी जोडलं गेलं. मात्र त्याने या चर्चा फेटाळल्या होत्या. आता तो गायक प्रतीक कुहडची एक्स गर्लफ्रेंड निहारिका ठाकूरसोबत लंडनमध्ये दिसला.

मध्यंतरीच्या काळात साराचे फोटो क्रिकेटर शुभमन गिलसोबतही व्हायरल झाले होते. एका मुलाखतीत शुभमनला याविषयी प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता. तुझ्या मते बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री कोणती, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शुभमनने लगेच साराचं नाव घेतलं.

साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने बोलल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.