Sara ali Khan हिचं ‘वन नाईट स्टँड’बद्दल मोठं वक्तव्य; ऐकून करीना कपूर देखील थक्क
सारा अली खान तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत, अनेक सेलिब्रिटींसोबत साराच्या नावाची चर्चा... 'वन नाईट स्टँड'बद्दल सारा म्हणते... सध्या सर्वत्र सैफ अली खान याच्या लेकीची चर्चा...
मु्ंबई : अभिनेत्री सारा अली खान कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या साराने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. सारा फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, स्वभावामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील साराचे असंख्य चाहते आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एवढंच नाही तर, सारा तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या व्हॉट वीमेन वॉन्ट या शोमध्ये देखील साराने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या.
शोमध्ये करीनाने साराला ‘वन नाईट स्टँड’बद्दल विचारलं. तू एका मॉर्डन कुटुंबातील मुलगी आहेस, तर वन नाईट स्टँड’बद्दल तुला काय म्हणायचं आहे? यावर सारा म्हणाली, ‘वन नाईट स्टँड असं कधीही झालं नाही…’ साराचं उत्तर ऐकल्यानंतर करीनाने मोकळा श्वास घेतला. तेव्हा देखील सारा तुफान चर्चेत आली. महत्त्वाचं म्हणजे साराचं नाव आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं.
अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत देखील साराच्या नावाची तुफान चर्चा रंगली. एकदा विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सारा हिला कार्तिकला डेट करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सारा म्हणाली, ‘हा.. मला आवडेल… पण त्याच्याकडे गडगंज पैसा असेल तरच… माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे की, ज्या मुलाकडे संपत्ती आहे… अशाच मुलाला डेट कर…’
साराच्या या वक्तव्यानंतर कार्तिक म्हणाला, ‘मी तुझ्यासोबत माझं अकाउंट डिटेल्स केले आहेत…’ सारा आणि कार्तिक यांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली. पण दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर मान्य केलं नाही. सध्या साराचं नाव भारतीय क्रिकेटर शुभमन गिल याच्यासोबत जोडलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी शुभमन गिल अभिनेत्री सारा अली खान हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. एका मुलाखतीमध्ये शुभमन याला आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शुभमन याने सारा अली खान हिचं नाव घेतलं. एवढंच नाही तर साराला डेट करत आहेस का? असा प्रश्न देखील क्रिकेटरला विचारण्यात आला.
या प्रश्नावर शुभमन म्हणाला, ‘शायद हा शायद ना…’ या उत्तरानंतर शुभमन तुफान चर्चेत आला. शिवाय सारा देखील शुभमन यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. पण साराने यावर मौन बाळगलं आहे. त्यामुळे शुभमन सारा अली खान हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
दरम्यान सारा खान आणि शुभमन गिल यांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांना एकत्र फिरताना स्पॉट करण्यात आलं. शिवाय दिल्ली येथील एका हॉटेलच्या बाहेर पडताना दोघांना एकत्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.