मंदिरात जाण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानने सुनावलं; म्हणाली “माझा जन्म..”

‘तुझे वडील मुस्लिम आहेत, तू आडनाव वडिलांचं लावतेस आणि दुसरीकडे मंदिरात जाऊन पूजा करतेस’, अशा शब्दांत टीका करणाऱ्यांना अभिनेत्री सारा अली खानने सडेतोड उत्तर दिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

मंदिरात जाण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानने सुनावलं; म्हणाली माझा जन्म..
Sara Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 1:47 PM

मुंबई : 20 मार्च 2024 | अभिनेत्री सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. साराला अनेकदा विविध धर्माच्या धार्मिकस्थळांना भेट दिल्याचं पाहिलं गेलंय. सारा अजमेर शरीफलाही जाताना दिसते तर त्याचवेळी ती केदारनाथसमोरही नतमस्तक होते. मात्र यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. वडिलांचं आडनाव लावूनसुद्धा इस्लाम धर्माचं पालन करत नसल्याची टीका तिच्यावर झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका कुटुंबात सारा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “माझ्या धार्मिक विश्वासांबद्दल प्रश्न विचारले जात असतील तर त्याचा मला त्रास होत नाही. कारण एक व्यक्ती म्हणून मी स्वत: कोण आहे हे मला कोणासमोरही सिद्ध करायची गरज नाही. आधी मी स्वत:ला इतरांसमोर कसं सादर करायचं, याविषयी फार विचार करायचे. मात्र ते करणं आता मी थांबवलं आहे”, असं सारा म्हणाली.

या मुलाखतीत सारा पुढे म्हणाली, “माझा जन्म एका धर्मनिरपेक्ष कुटुंबात आणि सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक देशात झाला आहे. मला अन्यायाविषयी उघडपणे बोलण्याची गरज कधीच भासली नाही, कारण विनाकारण बोलण्यात अर्थ नसतो. पण याचा अर्थ नाही की जे चुकीचं आहे त्याविरोधात उभं राहण्याची भावना माझ्या मनात नाही. माझ्यासोबत किंवा आजूबाजूला कोणासोबतही काही चुकीचं घडत असेल तर त्याविरोधात मी आवर्जून उभी राहते. जेव्हा लोकांना माझं काम किंवा अभिनय आवडत नाही, तेव्हा माझ्यावर त्यांच्या टीकांचा परिणाम होतो. पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. माझा धार्मिक विश्वास, माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी, एअरपोर्टवर मी कशी जाते हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. त्यासाठी मी कधीच कोणाची माफी मागणार नाही.”

हे सुद्धा वाचा

“जे लोक मला माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींसारखं किंवा कुटुंबीयांसारखं ओळखत नाहीत, त्यांना माझं धार्मिक स्थळांना जाणं विचित्र वाटू शकतं. माझा स्वभाव कसा आहे, मी कशी वागते हे माझ्या जवळच्या व्यक्तींना खूप चांगल्याप्रकारे माहीत असतं. पण प्रेक्षकांना माझी ही बाजू माहीत नसेल. म्हणूनच त्यांना माझ्याविषयी तसे प्रश्न पडत असावेत”, असंही ती पुढे म्हणाली.

याधीही सारा अली खानने याच मुद्द्यावरून प्रतिक्रिया दिली होती. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हा ती म्हणाली, “मी माझं काम खूप गांभीर्याने करते. मी लोकांसाठी काम करते, तुमच्यासाठी करते. जर तुम्हाला माझं काम आवडलं नाही तर मला कदाचित वाईट वाटू शकेल पण माझी वैयक्तिक श्रद्धा ही माझी स्वत:ची आहे. मी त्याच भक्तीने अजमेर शरीफला जाईन ज्या श्रद्धेने मी बांगला साहेब गुरुद्वारा किंवा महाकालला जाते. अशा ठिकाणांना मी भेट देत जाईन. लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या, मला त्याने फरक पडत नाही. तुम्हाला त्या जागेची ऊर्जा आवडणं गरजेचं असतं, मला त्या ऊर्जेवर विश्वास आहे.”

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....