‘या’ वयात सारा अली खान होणार आई, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लेक सारा अली खान हिचं लग्नाआधीच बेबी प्लानिंग... मुलाखतीत मोठा खुलासा करत अभिनेत्रीने मातृत्वावर केलंय मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...
मुंबई | 9 मार्च 2024 : अभिनेत्री सैफ अली खान हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सारा हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सारा आजच्या घडीला बॉलिवूडच्या सर्वत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तर इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अनेक सेलिब्रिटींसोबत देखील साराच्या नावाची चर्चा रंगली. ज्यामुळे साराचं खासगी आयुष्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागली.
एका मुलाखतीत सारा अली खान हिने तिच्या होणाऱ्या मुलांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. सारा हिला दोन मुलं हवी आहेत. त्यात अभिनेला पहिली मुलगी तर दुसरा मुलगा हवा होता. सारा म्हणाली होती, वयाच्या 32 व्या वर्षी मुलीला जन्म देईल, तर वयाच्या 35 व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म देईल…
सारा अली खान आता 28 वर्षांची आहे. 12 ऑगस्ट 1995 मध्ये सारा हिचा जन्म झाला. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लेक सारा अली खान तिच्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असते. सारा हिचं नाव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, कार्तिक आर्यन आणि वीर पहाडिया यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं.
सारा हिने कार्तिक आर्यन याच्यासोबत असलेल्या नात्यावर अनेकदा वक्तव्य देखील केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. पण अनेक ठिकाणी दोघांना ब्रेकअरनंतर देखील स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सारा हिचं नाव क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. एवढंच नाहीतर, दोघांचं ब्रेकअप झाल्यामुळे सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चा देखील दिल्या. पण आम्ही कधीही नात्यात नव्हतो असं साराने स्पष्ट केलं होतं. पण दोघांना देखील अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं होतं.
सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.