Sara Ali Khan | एक्स-बॉयफ्रेंडच्या घरी सजून गेली सारा अली खान, कारण…

Sara Ali Khan | अनेक वर्षांनंतर एक्स-बॉयफ्रेंडच्या घरी सजून पोहोचली सारा अली खान; कारण समोर जाणून तुम्हीही म्हणाल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान आणि एक्स - बॉयफ्रेंडची चर्चा... सोशल मीडियावर दोघांचा एकत्र फोटो व्हायरल

Sara Ali Khan | एक्स-बॉयफ्रेंडच्या घरी सजून गेली सारा अली खान, कारण...
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 10:26 AM

मुंबई : 23 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. त्यानंतर सारा हिने काधीही मागे वळून पाहिलं नाही. अनेक सिनेमांच्या माध्यमातून सारा चाहत्यांच्या भेटीस आली आणि चर्चेत राहिली. सारा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सारा हिचं नाव अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याचं नात्याबद्दल अभिनेत्रीने अधिकृत घोषणा केली नाही. आता सारा हिला तिच्या एक्स-बॉयफ्रेंडच्या घरी स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली.

अभिनेत्री सारा अली खान हिला अभिनेता कार्तिक आर्यन याच्या घरी स्पॉट करण्यात आलं. कार्तिक याच्या घरी सारा पारंपरिक लूकमध्ये गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. कार्तिक याच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सारा, बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आणि अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा देखील पोहोचली होती. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनेक दिवसांनंतर कार्तिक याच्या घरी सारा गेल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. कार्तिक याच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सारा हिच्यासोबतच अनेक सेलिब्रिटी देखील पोहोचले. सांगायचं झालं तर, सर्वसामान्य जनतेप्रमाणे सेलिब्रिटीदेखील गणेशोत्सव सण मोठ्या थाटात साजरा करताना दिसत आहेत.

सारा आणि कार्तिक आर्यन

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सारा आणि कार्तिक यांच्या नात्याची चर्चा रंगली. ‘लव्ह आज कल २’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन देखील शेअर केली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला, पण सारा आणि कार्तिक यांची जोडी हीट ठरली. त्यानंतर दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील नात्याबद्दल कधीही अधिकृत घोषणा केली नाही.

दरम्यान, सारा हिचं नाव भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत देखील चर्चेत होतं. पण काही दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला. सारा आणि शुबमन यांनी एकमेकांना सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण शुबमन याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल देखील हिने मौन बाळगलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.