Confirm…! सारा अली खान – शुबमन गिल यांच्या रिलेशनशिपबद्दल मोठं सत्य समोर, अभिनेत्रीने मान्य करताच…
Sara Ali Khan | सारा अली खान हिने क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत असलेलं नातं अखेर मान्य केलंच...? दोघांच्या रिलेशनशिपबद्दल मोठं सत्य अखेर समोर..., सारा अली खान हिच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा... अभिनेता सैफ अली खान याची लेक म्हणाली तरी काय?
मुंबई : 6 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री सारा अली खान फक्त तिच्या प्रोफेशनल आयु्ष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. आता देखील सारा भारतील क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा आणि शुबमन यांच्या नात्याची चर्चा रंगलेली आहे. सारा लवकरच बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे देखील दिसणार आहे. सध्या ‘कॉफी विथ करण 8’ शोचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. प्रोमोमध्ये सारा हिने शुबमन हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र शुबमन – सारा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
कोणाला डेट करत आहे शुबमन गिल?
‘कॉफी विथ करण 8’ शोच्या प्रोमो व्हिडीओमध्ये करण, सारा हिला शुबमन गिल याच्यासोबत रंगलेल्या नात्याच्या चर्चांबद्दल विचारताना दिसत आहे. यावर सारा हिने देखील मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर शुबमन याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
View this post on Instagram
शुबमन गिल याच्यासोबत डेटिंगच्या अफवांबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘सारा का सारा दुनिया गलत सारा के पीछे पडा है….’, सारा अली खान हिच्या मोठ्या वक्तव्यानंतर शुबमन सारा तेंडुलकर हिला डेट करत असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान, सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सारा – शुबमन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा रंगली होती. पण यावर दोघांनी देखील स्पष्टीकरण दिलं नाही. आता शुबमन याचं नाव सारा तेंडुलकर हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं आहे.
नुकताच, सारा तेंडुलकर आयसीसीच्या एका मॅचमध्ये शुभमन गिल याला चिअर करताना दिसली. शुबमन याने अर्धशतक केल्यानंतर सारा हिने स्टँडिंग ओव्हेशन देखील दिलं. आता सारा अली खानच्या या वक्तव्यानंतर शुभमन सारा अली खानला नाही तर सारा तेंडुलकर हिला डेट करत असल्याचं स्पष्ट झाले आहे. पण नात्यावर दोघांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.