Sara Ali Khan | अत्यंत कंजूस आहे सैफ अली खान याची लेक, साराचा अबू धाबीमधील कारनामा उघडकीस, सर्वांना बसला धक्का
बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीचन चर्चेत असते. सारा अली खान आणि विकी काैशल यांचा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान आणि विकी काैशल हे दिसले. सारा अली खान हिने नुकताच एक मोठा खुलासा केलाय.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सारा अली खान आणि विकी काैशल यांचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट आजच रिलीज झालाय. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaishal) हे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले होते. इतकेच काय तर चक्क राजस्थानमधील जयपुर येथे सारा अली खान ही विकी काैशल याच्यासोबत खरेदी करताना दिसली होती. सारा अली खान आणि विका काैशल हे त्यांच्या चित्रपटाचे (Movie) जोरदार प्रमोशन करताना दिसले होते. चित्रपटाची स्टोरी ही एका सर्वसामान्य कुटुंबावर आधारिक असल्याचे सांगितले जातंय.
सारा अली खान आणि विकी काैशल हे काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले होते. यावेळी विकी काैशल हा सारा अली खान हिची पोलखोल करताना दिसला. विकी काैशल याने थेट सांगितले की, सारा अली खान ही तिच्या आईला देखील ओरडते.
यावर सारा म्हणते की, माझ्या आईने 1600 रूपयांचा टाॅवेल खरेदी केला होता. तुम्हीच सांगा इतका महागडा टाॅवेल कोणी खरेदी करते का? मुळात म्हणजे सारा अली खान ही फार जास्त कंजूस आहे. याबद्दलचा मोठा खुलासा स्वत: सारा अली खान हिने केला आहे. सारा म्हणाली की, मी खूप जास्त मेहतनीने पैसे कमावते आणि खर्च देखील करते.
मुळात म्हणजे मी खूप जास्त कंजूस आहे. मी नुकताच अबू धाबी येथे आईफा 2023 साठी गेले होते. मी फक्त एकच दिवस अबू धाबीमध्ये राहणार होते. तिथे मला निर्मात्यांनी फोनवर बोलण्यासाठी रोमिंग पॅक अॅक्टिवेट करण्यासाठी सांगितला होता. पण मी त्यांचे ऐकले नाही आणि मी ते केला नाही. कारण मी अबू धाबीमध्ये फक्त एकच दिवस राहणार होते.
सारा अली खान हिने सांगितले की, मला विकी आणि चित्रपट निर्माते दिनेश विजान यांच्यासोबत बोलायचे होते. तर मला निर्मात्यांनी एक वॉयस मेसेज केला. त्यामध्ये होते की, 400 रुपयांमध्ये रोमिंग पॅक अॅक्टिवेट करू शकतो. मात्र, साराने तसे केले नाही आणि त्यांना सांगितले की, मी हेयर ड्रेसरमध्ये बिझी आहे. एका दिवसासाठी सारा अली खान हिला 400 रूपये खर्च करायचे नसल्याचे सारा हिने स्पष्ट केले.