बड्या नेत्याच्या मुलासोबत सारा अली खानचं अफेअर; केदारनाथनंतर राजस्थानचे फोटो व्हायरल
अभिनेत्री सारा अली खान तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राजस्थान ट्रिपचे काही फोटो पोस्ट करतेय. तर दुसरीकडे अर्जुन प्रताप बाजवासुद्धा राजस्थानमधल्याच हॉटेलमधील फोटो शेअर करत आहे. यावरून हे दोघं केदारनाथनंतर राजस्थान ट्रिपला एकत्र गेल्याच्या चर्चा आहेत.
अभिनेत्री सारा अली खान तिच्या चित्रपटांसोबतच ट्रॅव्हल आणि खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. अभिनेता कार्तिक आर्यननंतर तिचं नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं गेलं होतं. त्यानंतर आता सारा ही मॉडेल अर्जुन प्रताप बाजवाला डेट करत असल्याचं समजतंय. राजस्थानच्या हॉटेलमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आलं. राजस्थान व्हेकेशनमुळे ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे. साराने राजस्थानमधील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तर दुसरीकडे अर्जुनने राजस्थानमधल्याच हॉटेलच्या जिममध्ये वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात जेव्हा हे दोघं केदारनाथचं दर्शन करायला गेले, तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघांनी एकत्र केदारनाथचं दर्शन घेतलं आणि तिथे प्रार्थना केली. दोघांचा एकत्र फोटोसुद्धा व्हायरल झाला होता. सारा आणि अर्जुनने एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले नसले तरी एकाच वेळी एकाच ठिकाणाचे फोटो पोस्ट केल्याने चाहत्यांनी लगेचच त्यावरून कनेक्शन जोडण्यास सुरुवात केली.
अर्जुन प्रताप बाजवा हा प्रसिद्ध मॉडेल, एमएमए फायटर आणि बॉलिवूड इनसाइडर आहे. त्याने अक्षय कुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’सह इतरही काही फिल्म प्रोजेक्ट्समध्ये सहाय्यक म्हणून काम केलं होतं. अर्जुन हा राजकीय नेते फतेह जंग सिंह बाजवा यांचा मुलगा आहे. ते सध्या पंजाबमध्ये भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) उपाध्यक्ष आहेत.
View this post on Instagram
याआधी कार्तिक आर्यनसोबत साराच्या नात्याची खूप चर्चा होती. या दोघांनी ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. गेल्या वर्षी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या शोमध्ये या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. साराने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘सिम्बा’, ‘अतरंगी रे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सारा म्हणाली होती की 2020 हा तिच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ होता. “2020 हा माझ्यासाठी अत्यंत वाईट काळ होता. या सगळ्याची सुरुवात ब्रेकअपने झाली आणि पुढे गोष्टी अधिक वाईट होत गेल्या. ते खूपच वाईट वर्ष होतं”, असं ती म्हणाली होती.