रोटीसोबत सोनं, प्रत्येक ठिकाणी डायमंड्स.. अंबानींच्या कार्यक्रमाविषयी काय म्हणाली सारा?

मार्च महिन्यात जामनगरमध्ये पार पडलेल्या अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या फंक्शनविषयी आता सारा अली खान मोकळेपणे व्यक्त झाली. या कार्यक्रमात आम्ही रोटीसोबत सोनं खात होतो, असं ती मस्करीत म्हणाली.

रोटीसोबत सोनं, प्रत्येक ठिकाणी डायमंड्स.. अंबानींच्या कार्यक्रमाविषयी काय म्हणाली सारा?
सारा अली खान, अनंत अंबानी-राधिका मर्चंटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 11:21 AM

मार्च महिन्याच्या सुरुवातील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक नामांकित पाहुणे सहभागी झाले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही अंबानींच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सारा अली खान या भव्यदिव्य प्री-वेडिंग फंक्शनविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या अंबानींचा कार्यक्रम म्हणजे पाहुणाचारही तसाच असेल. तिथे सर्वांचं स्वागत कसं केलं गेलं, कोणत्या गोष्टींनी सर्वाधिक लक्ष वेधलं, याविषयी साराने सांगितलं.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत सारा मस्करीत म्हणाली, “त्यांनी आम्हाला सोनं खाऊ घातलं होतं. म्हणजे रोटीसोबत (चपाती) आम्ही सोनं खायचो. प्रत्येक ठिकाणी डायमंड्स होते.” नंतर तिने स्पष्ट केलं, “तो कार्यक्रम खूपच चांगला होता. आमच्या पाहुणचारासाठी त्यांनी बरीच व्यवस्था केली होती. मी अनंतसोबत एकत्र शाळेत शिकले. राधिकाला मी लहानपणापासून ओळखते. नीता मॅम आणि इतर सर्वजण आमच्याशी खूप प्रेमळपणे वागत होते. त्या कार्यक्रमातील अविस्मरणीय क्षण म्हणजे अनंत आणि राधिकाचा हस्ताक्षर सोहळा. दोघं एकत्र खूप छान दिसत होते.”

हे सुद्धा वाचा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे येत्या जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी जामनगरमध्ये तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीची गायिका रिहाना, अकॉन, दिलजित दोसांझ, अरिजीत सिंग, श्रेया घोषाल यांनी पाहुण्यांसमोर परफॉर्म केलं होतं. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी त्यांनी युरोपमध्ये एका आलिशान क्रूझवर आणखी एका प्री-वेडिंग पार्टीचं आयोजन केलं होतं. चार दिवस चाललेल्या या पार्टीत केटी पेरी, बॅकस्ट्रीट बॉइज यांनी परफॉर्म केलं होतं.

सारा अली खानच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ती लवकरच आयुषमान खुरानासोबत एका ॲक्शन कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेन्मेंट करणार आहेत. ‘ऐ वतन मेरे वतन’ आणि ‘मर्डर मुबारक’ हे तिचे चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. त्यांना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.