Zara Hatke Zara Bachke | सारा – विकी स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटगृहात पहावा की नको? एकदा जाणून घ्या

माउथ पब्लिसिटीमुळे सारा - विकी स्टारर 'जरा हटके जरा बचके' सिनेमावर आली अशी वेळ? सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच..., सर्वत्र सिनेमाची चर्चा...

Zara Hatke Zara Bachke | सारा - विकी स्टारर 'जरा हटके जरा बचके' चित्रपटगृहात पहावा की नको? एकदा जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 9:40 AM

मुंबई : नवीन सिनेमा प्रदर्शित झाला की चित्रपटगृहात तो पाहायला जावा की नको? अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगलेली असते. नुकताच अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शनापूर्वी दोघांनी ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं. सारा – विकी ही जोडी पहिल्यांदा ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या माध्यमातून एकत्र आल्यामुळे त्यांची ऑनस्क्रिन जोडी चाहत्यांना आवडली आहे की नाही? हे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनद्वारे सर्वांना कळेलच. ‘जरा हटके जरा बचके’ बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करेल अशी शक्यता निर्माते आणि सिनेमाच्या टीमने दर्शवली होती. त्यामुळे सध्या सर्वत्र सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या आकड्यांची चर्चा रंगत आहे.

सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता सारा – विकी ही जोडी प्रेक्षकांना अवडत असल्याचं दिसून येत आहे. शिवाय सिनेमाला माउथ पब्लिसिटीचा देखील फायदा झाला असल्याचं दिसून येत आहे. पहिल्या दिवशी सिनेमा ३ कोटी रुपयांपर्यंत कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ५.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे, शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमाला सुट्ट्यांचा फायदा होवू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिनेमा चित्रपटगृहात पाहण्यासाठी बाय वन गेट वन या ऑफरचा देखील सिनेमाला फायदा झाल्याचं दिसून येत आहे. सध्या सर्वत्र सारा आणि विकी स्टारर स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. त्यामुळे तुम्ही सिनेमा पाहण्याचा विचार करत असाल तर, ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमा नक्की चित्रपटगृहात पाहू शकता..

गेल्या काही दिवसांपासून सध्या बॉलिवूडचे वाईट दिवस सुरु असल्याची चर्चा रंगली होती. कारण एकमागे एक प्रसिद्ध सेलिब्रिटींचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल ठरत होते. पण सारा अली खान आणि विकी कौशलच्या सिनेमाने बॉलिवूडला वेगळी दिशा दिली आहे. सिनेमाच्या यशाच्या कलाकारांचं अभिनय आणि कथा फार महत्त्वाची असते हे ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कळत आहे.

सारा आणि विकी स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमा एक फॅमिली ड्रामा आहे ज्यात आधी प्रेम, लग्न आणि नंतर घटस्फोट झाल्याचं दितसत आहे. सिनेमात सारा आणि विकी साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. लक्ष्मण उतेरकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाचं बजेट ४० कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.