Sara Ali Khan: ‘या’ वर्षी सारा अडकणार लग्नबंधनात, नवरा आहे करोडपती उद्योजक!
Sara Ali Khan Marriage: गडगंज श्रीमंत पण फिल्म इंडस्ट्रीतील नाही... करोडपती उद्योजकासोबत सारा अली खान हिचं होणार लग्न! खान कुटुंबात लवकरच वाजणार सनई चौघडे, सध्या सर्वत्र सारा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...
अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान यांची लेक सारा अली खान कामय तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्री म्हणून काम करत असलेल्या सारा हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत देखील साराच्या नावाची तुफान चर्चे रंगली. पण नातं फार काळ टिकलं नाही. आता सारा हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सैफची लेक यंदाच्या वर्षी लग्न करेल अशी माहिती समोर येत आहे.
सारा अली खान हिचा साखरपुडा झाल्याची चर्चा देखील रंगली आहे. एका रेडीट युजरने साराचा साखरपुडा झाल्याचा दावा केला आहे. रेडिटच्या एका पोस्टनुसार, सारा लवकरच लग्न करणार आहे. सारा एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न करणार असल्याचा दावा युजरने पोस्टमध्ये केला आहे.
View this post on Instagram
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सारा हिचं खासगी आयुष्या पुन्हा चर्चेत आलं आहे. पोस्टनुसार, सारा आणि उद्योजकाच्या कुटुंबियांकडून दोघांच्या नात्याला होकार आहे. लग्नामुळे सारा प्रचंड आनंदी आहे… अशी देखील माहिती समोर येत आहे. उद्योजक देखील सारावर प्रचंड प्रेम करते.
‘मेट्रो इन दिनो’ सिनेमानंतर सारा लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. सिनेमाची शुटिंग संपल्यानंतर सारा हिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. ‘मेट्रो इन दिनो’ सिनेमा 13 सप्टेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
सांगायचं झालं तर, साराच्या लग्नाची चर्चा रंगली आहे, पण यावर अद्याप सारा आणि तिच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण सर्वत्र सारा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
अमृता सिंहने लेकीला दिलेला सल्ला
सारा हिचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं, पण आपल्या मुलीने कोणाच्या प्रेमात पडू नये… विशेषतः इंडस्ट्रीमधील कोणत्या पुरुषाच्या प्रेमात साराने अडकू नये… असं अमृता सिंह हिला वाटतं. कारण अमृता हिने करियरच्या शिखरावर असताना सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. पण लग्न शेवटपर्यंत टिकलं नाही.