लग्नानंतर आई हसणं विसरली होती…, अमृता – सैफ यांच्या नात्याबद्दल सारा अली खान हिचं मोठं वक्तव्य
Sara ali khan | 'आई-वडिलांनी घेतलेला घटस्फोटाचा निर्णय योग्यच होता, कारण...', अमृता सिंग - सैफ अली खान यांच्या नात्याबद्दल सारा अली खान हिचं मोठं वक्तव्य... सारा कायम तिच्या आई - वडिलांबद्दल सांगत असते... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...
अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफ अली खान याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. दोघे त्यांच्या संसारात आनंदी आहेत. पण घटस्फोटानंतर अमृता हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. सैफ आणि अमृता यांचं लग्न झालं तेव्हा सर्वत्र खळबळ माजली होती. कारण अमृता अभिनेत्यापेक्षा 12 वर्ष मोठी होती आणि सैफ याने करियरला सुरुवात केली होती. पण लग्नानंतर अमृता हिने अभिनयाचा निरोप घेतला. अभिनेत्रीने स्वतःचा पूर्ण वेळ कुटुंबाला दिला.
सैफ – अमृता यांना एक मुलगी सारा अली खान आणि एक मुलगा इब्राहिम अली खान… अशी दोन मुलं आहेत. मुलांच्या जन्मानंतर देखील सैफ – अमृता यांच्यातील वाद मिटले नाही. अखेर लग्नाच्या 13 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आई – वडिलांच्या घटस्फोटाचा सारा आणि इब्राहिम यांच्यावर वाईट परिणाम झाला होता. घटस्फोटानंतर अभिनेत्याने दुसरा संसार थाटला. तर अमृता हिने मुलांची निवड केली.
सारा आणि इब्राहिम त्यांच्या आईसोबत राहातात. पण दोघे देखील वडिलांना भेटण्यासाठी सैफच्या घरी आणि अनेकदा फिरायला देखील जातात. एका मुलाखतीत सारा हिने वडिलांची नाहीतर, आईची निवड केल्याबद्दल मोठा खुलासा केला होता. ‘माझी आई माझं संपूर्ण जग आहे… मी माझ्या आई शिवाय काहीही करु शकत नाही… माझ्यासाठी कपड्यांपासून मुलापर्यंत प्रत्येक गोष्टीची निवड माझी आई करते…’
‘माझ्यासाठी आईचा निर्णय आणि तिने दिलेले सल्ले फार महत्त्वाचे आहेत. मी माझ्या आईची मुलगी आहे आणि आमची जोडी भन्नाट आहे.. माझ्या आईकडे वडिलांसारखे विचार आणि आईसारखं मन आहे. मला माझ्या आईसारखं व्हायचं आहे. तिच्यासाठी मेहनत मला करायची आहे…’ असं देखील सारा म्हणाली होती.
एवढंच नाहीतर, सारा हिने करण जोहर याच्या शोमध्ये आई – वडिलांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता. ‘माझ्या आई-वडिलांनी घेतलेला घटस्फोटाचा निर्णय योग्य होता. दोघेही त्यांच्या वैवाहिक नात्यात आनंदी नव्हते. दोघे एकमेकांसोबत आनंदी नाहीत, हे मला लहानपणीच कळलं होतं. लग्नानंतर आई हसणं विसरली होती…’ असं देखील सारा म्हणाली होती.
सारा तिच्या आईसोबत राहात असली तर, करीना कपूर हिच्यासोबत अभिनेत्रीचे चांगले संबंध आहेत. करीना आणि सारा यांचे देखील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.