Sara Ali Khan | अमरनाथ धामला पोहोचली सारा अली खान, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, खास…
बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे सारा अली खान ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे सारा अली खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सारा अली खान हिचा हा चित्रपट (Movie) धमाका करताना दिसला. सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी हिट ठरली. जरा हटके जरा बचके चित्रपटाने कमाईमध्ये धमाका केला. विशेष म्हणजे जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान आणि विकी काैशल हे दिसले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन हे केले जात होते.
सारा अली खान ही कायमच हिंदू मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाते. अनेकदा यावरून सारा अली खान हिला खडेबोल सुनावले जातात. जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर सारा अली खान ही मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी विकी काैशल याच्यासोबत गेली होती. त्याचे फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.
इतकेच नाही तर जरा हटके जरा बचके चित्रपटाचे प्रमोशन करत असतानाही हिंदू मंदिरांमध्ये कायमच सारा अली खान ही दर्शनासाठी जाताना दिसली. नुकताच आता सारा अली खान हिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटोमध्ये अमरनाथ धाम यात्रा करताना सारा अली खान ही दिसत आहे.
Bollywood actress #SaraAliKhan undertakes Amarnath Yatra. This video of the actress going viral on social media. #JammuKashmir pic.twitter.com/n93M66nOcc
— P. Rekha (रेखा त्रिपाठी) (@rekhatripathi) July 20, 2023
सारा अली खान हिच्यासोबत चालताना बरेच लोक देखील दिसत आहेत. सारा अली खान हिच्या सुरक्षेसाठी काही पोलिस देखील दिसत आहेत. ब्लू ट्रेक सूटमध्ये सारा अली खान ही दिसत असून तिच्या गळ्यामध्ये साल आणि लाल रंगाची चुनरी दिसत आहे. यासोबत सारा अली खान हिचे असून काही फोटो व्हायरल होत असून बर्फामध्ये चहा पिताना सारा अली खान ही दिसत आहे.
सारा अली खान हे कायमच चर्चेत असलेले एक नाव आहे. सारा अली खान ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील सारा अली खान ही दिसते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सारा अली खान ही रिक्षाने प्रवास करताना दिसली होती.