Sara Ali Khan | थेट रस्त्याच्याकडेला स्वयंपाक करताना दिसली सारा अली खान, अभिनेत्रीला पाहून लोकही हैराण
सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. सारा अली खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. साराची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
मुंबई : सारा अली खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सारा अली खान (Sara Ali Khan) ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठी धमाल केली. सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaishal) यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली. या चित्रपटाने तगडी कमाई बाॅक्स आॅफिसवर केली.
सारा अली खान आणि विकी काैशल त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले. सारा अली खान ही सध्या विदेशात आपल्या मित्रांसोबत आणि आईसोबत खास वेळ घालवताना दिसतंय. सारा अली खान हिने विदेशातील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी ती मोठ्या बॅग घेऊन प्रवास करताना देखील दिसली. सारा अली खान हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा जबरदस्त असा लूक दिसला.
सारा अली खान हिचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये सारा अली खान ही चक्क रस्त्याच्याकडेला बसून स्वयंपाक करताना दिसतंय. सारा अली खान चक्क रस्त्याच्याकडेला बसून मॅगी तयार करताना दिसतंय. लोकांना सारा अली खान हिचा हा फोटो पाहून धक्का बसलाय.
अनेकांनी या व्हायरल होणाऱ्या फोटोवर कमेंट करत थेट म्हटले की, सारा रस्त्याच्याकडेला बसून का स्वयंपाक करतंय. विशेष म्हणजे सारा अली खान ही चक्क चुलीवर मॅगी करताना दिसतंय. यावेळी सारा अली खान हिचा लूक जबरदस्त असा दिसतोय. सारा अली खान ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात होते. इतकेच नाही तर सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र. यांनी कधीच आपल्या नात्यावर भाष्य केले नाही. मात्र, मध्यंतरी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे ब्रेकअप झाल्याची देखील जोरदार चर्चा रंगताना दिसली.