बारावीच्या निकालापूर्वी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने स्वत:ला खोलीत केलं होतं बंद; टक्के पाहून कोसळलं रडू

"मी माझ्या मैत्रिणींसोबत ट्रिपची प्लॅनिंग केली होती. पण निकालामुळे मला माझा प्लॅन रद्द करावा लागला. मी घरातच राहावं, अशी माझ्या आईवडिलांचीही इच्छा होती. मी आधी ठीक होते, पण निकालाच्या दिवशी खूप बेचैन झाले होते," असं ती म्हणाली.

बारावीच्या निकालापूर्वी 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने स्वत:ला खोलीत केलं होतं बंद; टक्के पाहून कोसळलं रडू
Ketaki KulkarniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 2:01 PM

मुंबई : दहावी आणि बारावीचा निकाल लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड धाकधूक असते. परीक्षेदरम्यान कितीही मेहनत घेतली तरी निकालाची भिती प्रत्येकाच्या मनात असते. अशीच भिती मराठमोळी अभिनेत्री केतकी कुलकर्णी हिच्याही मनात होती. म्हणूनच बारावीचा निकाल लागण्यापूर्वी केतकीने अक्षरश: स्वत:ला खोलीत बंद करून घेतलं होतं. निकाल लागेपर्यंत कोणाशीही भेटणार नसल्याचं तिने ठरवलं होतं. केतकीने ‘बॅरिस्टर बाबू’ आणि ‘विघ्नहर्ता गणेश’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ती लवकरच महेश भट्ट यांच्या आगामी ‘1920 हॉरर्स ऑफ द हार्ट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केतकी म्हणाली, “मी माझ्या मैत्रिणींसोबत ट्रिपची प्लॅनिंग केली होती. पण निकालामुळे मला माझा प्लॅन रद्द करावा लागला. मी घरातच राहावं, अशी माझ्या आईवडिलांचीही इच्छा होती. मी आधी ठीक होते, पण निकालाच्या दिवशी खूप बेचैन झाले होते. त्यामुळे मी स्वत:ला खोलीत बंद करून घेतलं होतं. निकाल लागल्यानंतर माझ्या भावाने ते पाहिलं आणि आईने मला टक्केवारी सांगितली. तेव्हा मी बंद खोलीतून बाहेर आले. मला 81 टक्के मिळाले आणि ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी 75 टक्क्यांपर्यंत अपेक्षा केली होती.”

हे सुद्धा वाचा

“मी सकाळपासून प्रार्थना करत होती आणि निकाल लागल्यानंतर मी रडू लागले. अर्थातच ते आनंदाश्रू होते. सरी या चित्रपटाचं शूटिंग, प्रमोशन आणि त्यानंतर बॉलिवूड पदार्पणाची तयारी यांमुळे अभ्यास करणं खूप कठीण होतं. पण माझ्या कुटुंबीयांनी माझी खूप साथ दिली”, असं तिने पुढे सांगितलं.

महेश भट्ट यांच्या ‘1920’ या चित्रपटाची ऑफर कोणत्याही ऑडिशनशिवाय मिळाल्याचंही तिने स्पष्ट केलं. “मी फक्त माझा प्रोफाइल पाठवला होता आणि त्यांनी माझी निवड केली. बऱ्याच मिटींग्सनंतर आम्ही शूटिंगला सुरुवात केली. माझ्यासाठी ही भूमिका म्हणजे एक आव्हान आहे. विक्रम भट्ट आणि त्यांची संपूर्ण टीम मला सर्व सीन्स नीट समजवायचे”, असं ती म्हणाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्ट करतेय. यामध्ये केतकीसोबतच अविका गौर, बरखा सेनगुप्ता, राहुल देव आणि अमित बहल यांच्याही भूमिका आहेत. येत्या 23 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट्ट यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.