पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 8 महिन्यांतच अभिनेत्री दुसऱ्यांदा गरोदर? सत्य आलं समोर

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील लोकप्रिय जोडी म्हणजेच अभिनेता शोएब इब्राहिम आणि अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या वर्षी जून महिन्यात आई-बाबा झाले. 21 जून 2023 रोजी दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला. आता डिलिव्हरीच्या आठ महिन्यांतच ती पुन्हा गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे.

पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 8 महिन्यांतच अभिनेत्री दुसऱ्यांदा गरोदर? सत्य आलं समोर
दीपिका कक्करImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 9:10 AM

मुंबई : 15 फेब्रुवारी 2024 | ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमरनची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या तिच्या प्रेग्नंसीच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. दीपिकाला नुकतंच पती शोएब इब्राहिमसोबत पाहिलं गेलं होतं. यावेळी तिने लाल रंगाचा सूट परिधान केला होता आणि तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटो आणि व्हिडीओंमध्ये दीपिका तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आणि यावरूनच तिच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरू झाली. पहिल्या प्रेग्नंसीनंतर लगेचच आठ महिन्यांत दीपिका दुसऱ्यांदा गरोदर आहे की काय, असा सवाल अनेकांनी केला होता. त्यावर आता तिच्या टीमकडून उत्तर देण्यात आलं आहे.

दीपिकाने 2011 मध्ये रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील सहअभिनेता शोएब इब्राहिमशी निकाह केला. 22 फेब्रुवारी 2018 रोजी या दोघांचा निकाह पार पडला होता. लग्नासाठी दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपलं नाव बदललं. दीपिकाने लग्नानंतर फायजा असं नाव बदललंय, मात्र चाहत्यांसाठी ती दीपिका म्हणूनच ओळखली जाते. गेल्या वर्षी जून महिन्यात तिने मुलाला जन्म दिला. आता पहिल्या मुलाच्या डिलिव्हरीनंतर आठ महिन्यांत ती पुन्हा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

दीपिका दुसऱ्यांदा गरोदर नाही, असं तिच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दीपिकाने तिचा दुपट्टा ज्याप्रकारे घेतला होता, त्यामुळे लोकांना गैरसमज झाला असावा, असंही त्यांनी म्हटलंय. मुलाच्या जन्मानंतर दीपिकाने कामातून ब्रेक घेतला आहे. ती बिग बॉसच्या बाराव्या पर्वाची विजेती ठरली होती

दीपिकाच्या पहिल्या बाळाचा जन्म आठव्या महिन्यातच झाला होता. बाळाच्या डिलिव्हरीची तारीख जुलै महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात होणार होती. मात्र जूनमध्येच तिने बाळाला जन्म दिला. गरोदरपणातही दीपिकाने विविध पोस्ट आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. दीपिका आणि शोएबने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नंसी आणि अभिनयक्षेत्राला रामराम करण्याविषयी वक्तव्य केलं होतं. याविषयी पती शोएबशीही चर्चा केल्याचं तिने सांगितलं. “मी गरोदरपणाच्या या टप्प्याचा फार आनंद घेतेय. शोएब आणि माझी उत्सुकता वेगळ्याच पातळीवर आहे. मी फार कमी वयात कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर सलग 10 ते 15 वर्षे मी काम केलं. गरोदर झाल्यानंतर मी शोएबला सांगितलं होतं की मला अभिनयक्षेत्र सोडायचं आहे. मला एक गृहिणी आणि आई म्हणून पुढचं आयुष्य जगायचं आहे”, असं ती म्हणाली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.