सतिश कौशिक यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आता सलमान खान पूर्ण करणार

अभिनेते सतिश कौशिक यांच्या निधनाने अनेक बॉलिवूड कलाकारांना चांगलाच धक्का बसला आहे. अनेक जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

सतिश कौशिक यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आता सलमान खान पूर्ण करणार
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 5:26 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान ( Salman Khan ) सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. या दरम्यान सलमानला ‘तेरे नाम’ चित्रपटाची आठवण झाली. यावेळी बोलताना त्याने ‘तेरे नाम’चा सिक्वेल आणि अभिनेता सतीश कौशिकबद्दलही ( Satish Kaushaik ) खुलासा केला.

2003 साली प्रदर्शित झालेला सलमानचा ‘तेरे नाम’ ( Tere naam ) हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता. बऱ्याच वर्षांनंतर सतीन कौशिक यांनी सलमान खानसोबत ‘तेरे नाम 2’ च्या कल्पनेवरही चर्चा केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने सांगितले की, सतीश कौशिक त्याच्याकडे 20 वर्षांपूर्वी ‘तेरे नाम’साठी एका ओळीची कल्पना घेऊन आले होते आणि त्यानंतर सलमानला वाटले की ही एक सुपर आयडिया आहे. सलमान खानने सतीश कौशिकसोबत चांगले संबंध असल्याचेही सांगितले.

तेरे नाम सिनेमाचा सिक्वेल

सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी दिल्लीत निधन झाले. तिसऱ्या चित्रपटाच्या कामासाठी ते मुंबईत येणार होते, पण त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सलमानने पुढे खुलासा केला की त्यांनी ‘तेरे नाम’ ( Tere Naam 2 ) च्या कथानकावर चर्चा केली होती आणि 20 वर्षांनंतर कथेत काय घडले असते. त्यांनी सलमानला वचन दिले होते की ते या पटकथेवर लवकरच काम सुरू करणार आहेत. भविष्यात कधीतरी ‘तेरे नाम’चा सिक्वेल बनवण्याचा विचार करणार असल्याचे सलमानने सांगितले.

सलमान खानचा आगामी चित्रपट

सलमान खान 21 एप्रिल रोजी ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात साऊथ स्टार दग्गुबती व्यंकटेश, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी यांच्यासह अनेक नावाजलेले स्टार्स आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.