मित्र असावा तर असा… सतीश कौशिक यांच्या लेकीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करतायेत Anupam Kher, पाहा व्हिडीओ

वडील सतीश कौशिक यांच्या निधनानंतर लेक वंशिकाला अभिनेते अनुपम खेर यांचा मोठा आधार.. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल भावुक

मित्र असावा तर असा... सतीश कौशिक यांच्या लेकीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करतायेत Anupam Kher, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 5:12 PM

मुंबई : अभिनेते अनुपम खेर कायम त्यांच्या स्वभावामुळे चर्चेत असतात. शिवाय अनुपम खेर यांना प्रत्येक नात्याचं महत्त्व देखील चांगल्या प्रकारे माहिती आहे. चाहत्यांना अनुपम खेर आणि दिवंगत अभिनेता सतीश कौशिक यांच्या मैत्रीबद्दल सर्वकाही माहित आहे. अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली.. एवढंच नाही तर, एकमेकांच्या चांगल्या वाईट काळात देखील दोघे कायम सोबत राहिले. दरम्यान सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर यांनी कौशिक कुटुंबाला मोठा आधार दिला. एवढंच नाही तर, आता अनुपम खेर, मित्र सतीश कौशिक यांच्या मुलीचा सांभाळ स्वतःच्या लेकीप्रमाणे करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी अनुपम खेर सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका हिच्यासोबत दिसतात.. आता देखील अनुपम खेर आणि वंशिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. सध्या सर्वत्र दोघांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे..

अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांना एक दिलं होतं की, वंशिकाला ते कधीही एकटं सोडणार नाहीत.. सतीश यांच्या निधनानंतर अनुपम खेर मित्राला दिलेलं वचन पाळताना दिसत आहेत.. सतीश कौशिक यांना दिलेलं वचन आणि वंशिकाच्या प्रेमापोटी अनुपम खेर त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत वंशिका हिच्यासोबत वेळ व्यतीत करताना दिसतात.

हे सुद्धा वाचा

नुकताच, अनुपम खेर यांनी वंशिकाला हॉटेलमध्ये जेवायला नेलं होतं. हॉटेलमध्ये दोघांनी मस्त देखील केली.. शिवाय फोटोसेशन देखील केलं.. वंशिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत वंशिकाने कॅप्शनमध्ये, ‘बाबा आणि मी कायम नाश्ता आणि लंचसाठी मॅरियटमध्ये यायचो.. माझे आवडते काका अनुपम खेर यांच्यासोबत याठिकाणी पुन्हा  आल्यामुळे मी आनंदी आहे.. अशात रिल तर बनवायलाच हवा.. फक्त अनुपन खेर यांच्यासोबत…’

सध्या वंशिकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे.. वंशिकाच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.. शिवाय प्रत्येकाच्या आयुष्यात अनुपम खेर यांच्यासारखा एक मित्र हवा.. असं देखील व्हिडीओ पाहून चाहते म्हणत आहेत.. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त वंशिका आणि अनुपम खेर यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सतीश कौशिक यांना वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सतीश यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सतीश कौशिक यांचं निधन झालं. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला होता.. पण आता कौशिक कुटुंब स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे..

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.