Satish Kaushik मृत्यूप्रकरणी विकास मालू यांच्या फार्महाऊसवर पोहोचले दिल्ली पोलीस

होळीच्या पार्टीला हजेरी लावण्यासाठी सतीश कौशिक हे खासकरून मुंबईहून गुरुग्रामला निघाले होते. फार्महाऊसवर झालेल्या होळी पार्टीत बरेच इतर बिझनेसमनसुद्धा सहभागी झाले होते.

Satish Kaushik मृत्यूप्रकरणी विकास मालू यांच्या फार्महाऊसवर पोहोचले दिल्ली पोलीस
Satish Kaushik Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 7:35 AM

दिल्ली : अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधन प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. 9 मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनापूर्वी ते दिल्लीतील त्यांचे खास मित्र विकास मालू यांच्या फार्महाऊसवर गेले होते. विकास मालू हे बिझनेसमन आहेत. सतीश यांनी ज्या फार्महाऊसमध्ये पार्टी केली होती, त्याचे मालक कुबेर ग्रुपचे विकास मालू आहेत. त्यांची पत्नी सान्वी मालूने पतीवरच सतीश कौशिक यांना जीवे मारल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दिल्ली पोलीस सध्या या आरोपांचा तपास करत आहे. त्यासाठी विकास मालू यांच्या फार्महाऊसवर पोलीस पोहोचली आहे.

सतीश कौशिक हे त्यांच्या निधनापूर्वी फार्महाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत सहभागी झाले होते. 9 मार्च रोजी तिथे उपस्थित असलेले स्टाफ मेंबर्स आणि गार्ड्स यांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस फार्महाऊसवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे त्या पार्टीत कोण कोण सहभागी झाले होते हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी गार्ड रुमचं एण्ट्री रजिस्टरसुद्धा तपासलं आहे.

हे सुद्धा वाचा

सतीश कौशिक यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

सतीश यांनी विकास यांना 15 कोटी रुपये कर्ज दिले होते आणि ते पैसे परत करावं लागू नये म्हणून त्यांनी सतीश कौशिक यांचा जीव घेतला, असा आरोप सान्वी मालूने केला. मात्र हे सर्व आरोप फेटाळत आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया विकास मालू यांनी दिली होती. या आरोपांवर कौशिक यांची पत्नी शशी कौशिक यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली.

सान्वी यांनी विकास यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन आहेत, असं शशी म्हणाल्या. “सतीश आणि विकास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पैशांसाठी विकास कोणाचा जीव घेऊ शकत नाही. सतीश हे होळीच्या पार्टीसाठी त्यांच्या फार्महाऊसवर गेले होते.” इतकंच नव्हे तर त्यांनी पैशांच्या देवाण-घेवाणीचाही मुद्दा नाकारला आहे.

कोण आहेत विकास मालू?

विकास मालू आणि सतीश कौशिक यांची मैत्री फार जुनी आहे. विकास मालू हे व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या कंपनीचं नाव कुबेर ग्रुप आहे. विकास हे सतीश यांचे फॅमिली फ्रेंडसुद्धा आहेत. त्यांना अनेकदा कौशिक यांच्यासोबत पाहिलं गेलंय. होळीच्या पार्टीला हजेरी लावण्यासाठी सतीश कौशिक हे खासकरून मुंबईहून गुरुग्रामला निघाले होते. फार्महाऊसवर झालेल्या होळी पार्टीत बरेच इतर बिझनेसमनसुद्धा सहभागी झाले होते.

सतीश कौशिक यांचं 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत 10 मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनुपम खेर, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, जॉनी लिव्हर, जावेद अख्तर, बोनी कपूर, पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकारांनी आपल्या लाडक्या सहकलाकाराला अंतिम निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.