Satish Kaushik मृत्यू प्रकरणी मॅनेजरचा मोठा खुलासा, ‘जेवण झाल्यानंतर त्यांना फोन आला आणि…’
Satish Kaushik मृत्यू प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा, फार्म हाऊसमध्ये असताना सतीश यांनी कोणाला केला फोन, त्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल झाले आणि...
Satish Kaushik : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सतीश कौशिक यांचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने झालं असं सांगण्यात आलं. पण दिल्ली पोलीस सतीश कौशिक यांच्या निधनाीची कसून चौकशी करताना दिसत आहेत. मृत्यूप्रकरणी पोलीस सतीश कौशिक यांच्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात आहेत. आता पोलिसांनी सतीश कौशिक यांचे मॅनेजर संतोष राय यांची चौकशी केली आहे. चौकशीत संतोष यांनी धक्कादायक खुसाला केला आहे. सध्या सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सतत नवीन अपडेट समोर येत आहेत.
चौकशीत संतोष यांनी सांगितल्यानुसार, होळीची पार्टी संपल्यानंतर सतीश फार्म हाऊसमधील त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर रात्री ९ वाजता सतीश जेवण करण्यासाठी आले. जेवण झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या खोलीत गेले आणि आयपॅडवर व्हिडीओ पाहत होते. रात्री जवळपास त्यांनी संतोष रॉय यांना फोन करून प्रकृती खालावली असल्याचं सांगितलं.
सतीश यांना अस्वस्थ वाटत होतं आणि त्यांच्या छातीत देखल दुखत होतं. त्यानंतर संतोष यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांच निधन झालं. सतीश कौशिक यांच्या निधनाचं मुख्य कारण हृदय विकाराचा झटका असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
ज्या फार्म हाऊसमध्ये पार्टी सुरु होती, त्या ठिकाणी देखील पोलिसांनी तपासणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी ज्या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक यांनी होळीची पार्टी केली होती. त्याठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी काही औषधं जप्त केली आहेत. यामध्ये सतीश यांची नियमीत ओषधं होती. याशिवाय काही औषधं तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी कोणती गोष्ट समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचं निधन संशयास्पद नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं नाही. कारण त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. अधिक तपासणीसाठी सतीश कौशिक यांचं रक्त आणि हृदय ठेवण्यात आलं आहे. जवळपास १५ दिवसांनंतर त्यांचे रक्त आणि हृदयाचे रिपोर्ट पोलिसांना मिळणार आहेत.
सतीश कौशिक यांचे रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांच्या निधनाचं खरं कारण समोर येईल असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र सतीश यांच्या निधनाची चर्चा रंगत आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं.