‘या’ कारणामुळे Satish Kaushik यांच्या मनात आला स्वतःला संपवण्याचा विचार; पण…
सतीश कौशिक यांच्या आयुष्यात असं कोणतं वळण आलं, ज्यामुळे त्यांनी केला स्वतःला संपवण्याचा विचार; काय घडलं होतं तेव्हा?... कारण जाणून तुम्हीही म्हणाल...
Satish Kaushik : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ – उतार येत असतात. अशा परिस्थितीत काही लोक खचून जातात, तर काही मात्र नव्याने अनेक नव्या गोष्टींची सुरुवात करतात. अभिनेते सतीश कौशिक यांच्या आयुष्यात देखील अनेक अडचणी आल्या. पण त्यांनी स्वतःचा प्रवास कधीही थांबवला नाही. सतीश कौशिक यांनी कायम अपयशावर विजय मिळवला. पण एकदा सतीश कौशिक यांनी चक्क स्वतःला संपवण्याचा विचार केला. या घटनेचा खुलासा सतीश कौशिक यांनी एका मुलाखतीत केला. सतीश कौशिक यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांनी केलेलं काम प्रेक्षकांनी प्रेरित करत आहे.
सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९६७ साली हरियाणा याठिकाणी झाला. NSD (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) आणि FTII (फिल्म एन्ड टेलीव्हीजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया) मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. अभिनय क्षेत्रात सतीश यांनी पदार्पण केल्यानंतर त्यांना अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना केला.
सतीश कौशिक यांना करियरमध्ये प्रचंड स्ट्रगल करावं लागला. १९८० साली सतीश कौशिक यांनी करियरला सुरुवात केली. पण त्यांना लोकप्रियता १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील कॅलेंडर या भूमिकेतून मिळाली. कॅलेंडर या भूमिकेमुळे सतीश कौशिक प्रसिद्धीझोतात आले. पण अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.
१९८३ साली प्रदर्शित झालेल्या शेखर कपूर यांच्या ‘मासूम’ सिनेमातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. ‘रूप की रानी’, ‘चोरों का राजा’ या सिनेमांच्या दिग्दर्शनानंतर सतीश कौशिक यांच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांची निर्मिती बोनी कपूर यांनी केली. सिनेमात अनिल कपूर आणि श्रीदेवी महत्त्वाच्या भूमिकेत होते. सिनेमतील एक सीन चालत्या ट्रेनमधून हीरे चोरी करण्याचा होता. 1992-93 साली हा सीन चित्रित करण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये लागले होते असं सांगण्यात येत आहे.
सिनेमाचा मोठा बजेट आणि तगडी स्टार कास्ट असूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यामुळे सतीश कौशिक यांना मोठा धक्का बसला. सिनेमाला अपयशाचा सामना करावा लागल्यामुळे दुःखी असलेल्या सतीश कौशिक यांनी स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला. ही घटना खुद्द सतीश कौशिक यांनी एक मुलाखतीत सांगितला.
अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांना वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सतीश यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सतीश कौशिक यांचं निधन झालं.