Satish Kaushik | सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अशी झाली मुलीची अवस्था; पुतण्याने सांगितली परिस्थिती

"मला माझ्या मुलीसाठी जगायचं आहे. शशी आणि वंशिकाची काळजी घे. मला मरायचं नाही", असं सतीश कौशिक निधनापूर्वी त्यांच्या मॅनेजरला म्हणाले होते. होळी पार्टीनिमित्त मित्राला भेटायला गेलेल्या सतीश कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Satish Kaushik | सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अशी झाली मुलीची अवस्था; पुतण्याने सांगितली परिस्थिती
सतीश कौशिक आणि त्यांचे कुटुंबीय
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 8:16 AM

मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाचं वृत्त हे संपूर्ण कलाविश्वासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक होतं. 9 मार्च रोजी त्यांची अखेरचा श्वास घेतला. होळी पार्टीनिमित्त मित्राला भेटायला गेलेल्या सतीश कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. एकीकडे त्यांच्या निधनानंतर मित्र विकास मालू यांच्यावर बरेच आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे सतीश यांचे कुटुंबीय अजूनही अतीव दु:खात आहेत. पत्नी शशी आणि मुलगी वंशिका यांच्यासाठी सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी पचवणं खूप कठीण आहे. आता कौशिक यांचा पुतणा निशांतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शशी आणि वंशिका कसे आहेत, याविषयी सांगितलं.

“त्या दोघी या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हे करणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. शशी काकी शांत होऊन जातात आणि आठवणींमध्ये हरवून जातात. वंशिका पाहुण्यांसमोर काहीच बोलत नाही. मात्र जेव्हा ती एकटीच असते, तेव्हा एका कोपऱ्यात निराश होऊन बसते”, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत निशांत यांना सतीश कौशिक यांच्या शेवटच्या इच्छेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “त्यांना त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसला खूप मोठ्या पातळीवर घेऊन जायचं होतं. त्यांना एक मोठा स्टुडिओ बनवायचा होता.” सतीश कौशिक यांच्या अस्थींचं विसर्जन हरिद्वारमध्ये केल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

सतीश कौशिक यांनी 7 मार्च रोजी मुंबईत चित्रपटसृष्टीतील मित्रमैत्रिणींसोबत होळी साजरी केली. त्यानंतर ते दिल्लीला मित्र विकास मालू यांच्या होळी पार्टीत सहभागी होण्यासाठी गेले होते. 9 मार्च रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनाचा तपास सध्या पोलीस करत आहेत. कारण विकास मालू यांच्या पत्नीने त्यांच्यावर सतीश यांना जीवे मारल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

सतीश कौशिक यांनी शशी कौशिक यांच्याशी लग्न केलं होतं आणि या दोघांना एक मुलगा होता. मात्र वयाच्या दुसऱ्याच वर्षी त्यांच्या मुलाचं निधन झालं. त्यानंतर 2011 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून हे दोघं पुन्हा पालक झाले. कौशिक यांची मुलगी वंशिका आता 10 वर्षांची आहे. सोशल मीडियावर ते अनेकदा मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायचे.

मूळचे हरयाणाचे असलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीत कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि FTII मधून प्रशिक्षण पूर्ण केलं. कामासाठी मुंबईची वाट पकडलेल्या सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरही काम केलं.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.