Satyamev Jayate 2 | ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय जॉन अब्राहमचा चित्रपट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) लवकरच सत्यमेव जयते 2 (Satyameva Jayate 2) या चित्रपटात दिसणार आहे.

Satyamev Jayate 2 | ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय जॉन अब्राहमचा चित्रपट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 10:55 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) लवकरच सत्यमेव जयते 2 (Satyameva Jayate 2) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. आता चित्रपटाच्या रिलीजचा तारीख देखील पुढे आली आहे. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 14 मे रोजी रिलीज होईल. यासोबतच मोठी बातमी अशी आहे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (Satyameva Jayate 2 will be released on May 14)

चित्रपटाच्या रिलीजची तारीख आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहिर करण्यात आली आहे. जॉन अब्राहमने हातात देशाचा झेंडा पकडत पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला फोटो शेअर करत लिहिले आहे की, तन मन धन पेक्षा महत्वाचे जण गण मन, सत्यमेव जयते 2 च्या टिमकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! 14 मे ला ईदच्या दिवशी भेटूयात सत्यमेव जयते 2

मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्यासह अनेक स्टार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. 2018 मध्ये ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. या चित्रपटात दिव्या खोसला कुमार देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दिव्याने काही फोटो जॉनबरोबर तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी घातलेली दिसत होती. जॉन अब्राहमने काही दिवसांपूर्वी सत्यमेव जयते 2 चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.

उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी ‘सत्यमेव जयते 2’ चे शूटिंग सुरू होते. लखनौमधील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर जॉन अब्राहम ‘सत्यमेव जयते 2’ च्या टीमसह काही दिवसांच्या शूटसाठी वाराणसीत होता. पण तिथल्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता.. अ‍ॅक्शन सीन शूट करताना त्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे शूटिंग मध्येच थांबवावे लागले होते.

संबंधित बातम्या : 

‘हाऊज द जोश? हाय सर…’, विकी कौशलचा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

The Girl On The Train | नेटफ्लिक्सवर लोकांचा संताप, चित्रपट पाहताच चाहते भडकले…!

करिनाचे हे दोन फोटो पाहा, आई आणि बाळाचं आयुष्य सुरक्षित करा!

(Satyameva Jayate 2 will be released on May 14)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.