Satyaprem Ki Katha | 100 कोटीच्या क्लबमध्ये सामील झाला ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट, कियारा आणि कार्तिकची जोडी पुन्हा ठरली हिट
सत्यप्रेम की कथा हा चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे परत एकदा कियारा आणि कार्तिक आर्यन यांची जोडी हिट ठरली आहे. पुढीला काही दिवस चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. सत्यप्रेम की कथा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
मुंबई : सत्यप्रेम की कथा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे झाले आहेत तरीही बाॅक्स आॅफिसवर चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळतोय. विशेष म्हणजे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) यांची जोडी परत एकदा धमाल करत आहे. यापूर्वी कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा भूल भुलैया 2 (Bhool Bhulaiya 2) हा चित्रपट देखील हिट ठरला होता आणि आता सत्यप्रेम की कथा तूफान कमाई करताना दिसत आहे. सत्यप्रेम की कथा हा चित्रपट यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. अजूनही चित्रपटाचा जलवा कायमच आहे.
पुढील काही दिवस चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. विशेष म्हणजे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन हे सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले होते. निर्मात्यांना देखील चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मिळतोय.
सत्यप्रेम की कथा हा चित्रपट आता 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सत्यप्रेम की कथा चित्रपटाने आतापर्यंत 68.06 कलेक्शन हे भारतामध्ये केले आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची ओपनिंगही जबरदस्त ठरली आहे. सत्यप्रेम की कथा चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 9.25 कोटींचे कलेक्शन करत धमाका केला.
नुकताच कियारा अडवाणी हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबतच कियारा अडवाणी हिने सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. कियारा अडवाणी हिने हे पोस्टर शेअर करत आपल्या चाहत्यांसोबत मोठी माहिती शेअर केली आहे. कियारा अडवाणी हिची पोस्ट आता व्हायरल होताना दिसत आहे.
कियारा अडवाणी हिने पोस्टमध्ये सांगितले की, सत्यप्रेम की कथा चित्रपटाने जगभरातून 100 कोटींचे कलेक्शन केले आहे. आता कियारा अडवाणी हिच्या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट देताना दिसत आहेत. सर्वजण कियारा आणि कार्तिक यांच्या जोडीचे काैतुक करताना देखील दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर जलवा करताना दिसत आहेत.