एका अमराठी माणसाने..; रणदीप हुडाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी सौरभ गोखलेची पोस्ट

अभिनेता रणदीप हुडा दिग्दर्शित आणि अभिनीत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाबाबत अभिनेता सौरभ गोखलेनं खास पोस्ट लिहिली आहे. 22 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

एका अमराठी माणसाने..; रणदीप हुडाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाविषयी सौरभ गोखलेची पोस्ट
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात रणदीप हुडाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 8:10 AM

अभिनेता रणदीप हुडाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुआधार कमाई करत नसला तरी या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं आणि रणदीप हुडाच्या दिग्दर्शनाचं अनेकांकडून कौतुक होत आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित रणदीपच्या मेहनतीची प्रशंसा केली आहे. यात मराठी कलाकारांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी रणदीपच्या चित्रपटाबद्दल खास पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता अभिनेता सौरभ गोखलेनं इन्स्टाग्रावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

सौरभ गोखलेची पोस्ट-

‘रणदीप हुडा या माणसाच्या डेडिकेशनला सलाम आहे. साक्षात याने तात्याराव समोर उभे केले. ही व्यक्तिरेखा तो जगलाय. वीर सावरकरांचं संपूर्ण आयुष्य आणि कार्य 2 तासांत दाखवणं हे केवळ अशक्य आहे आणि आताची पिढी या व्यक्तिमत्वापासून ठरवून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असण्याच्या काळात एका अमराठी माणसाने प्रचंड अभ्यास करून ही व्यक्तिरेखा लोकांसमोर उभ करणं हे अत्यंत धाडसाचं आणि अभिमानास्पद कार्य. नतमस्तक! अमित सियाल, राजेश खेरा, अंकिता लोखंडे आणि इतर सर्वांची कामेही अप्रतिम. न चुकता हा चित्रपट प्रत्येकाने बघा,’ अशा शब्दांत त्याने कौतुक केलंय.

हे सुद्धा वाचा

22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज सात दिवस पूर्ण झाले आहेत. या सात दिवसांत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने 11.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचा बजेट 20 कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा धीम्या गतीने कमाई सुरू आहे. रणदीपने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी त्याला प्रचंड बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही करावं लागलं. सुरुवातीला या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. मात्र शूटिंगदरम्यान काही मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी चित्रपटातून काढता पाय घेतला आणि त्यानंतर रणदीपने दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी जबाबदाऱ्या पेलल्या आहेत.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई-

पहिला दिवस- 1.05 कोटी रुपये दुसरा दिवस- 2.25 कोटी रुपये तिसरा दिवस- 2.7 कोटी रुपये चौथा दिवस- 2.15 कोटी रुपये पाचवा दिवस- 1.05 कोटी रुपये सहावा दिवस- 1 कोटी रुपये सातवा दिवस- 1.15 कोटी रुपये

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.