सायली संजीव-सिद्धार्थ चांदेकरमध्ये नेमकं काय बरं चाललंय?

चुलबुली सायली संजीव आणि चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर.. ही जोडी ऐकायला आणि पहायलाही अनोखी वाटते. मात्र आता हीच जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ओले आले' या चित्रपटाचा टीझर, त्यातील फुलपाखरू हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सायली संजीव-सिद्धार्थ चांदेकरमध्ये नेमकं काय बरं चाललंय?
Sayali Sanjeev and Siddharth ChandekarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 1:36 PM

मुंबई : 20 डिसेंबर 2023 | ‘सांग ना मनाला माझ्या कसं सावरू’ म्हणणारी चुलबुली सायली संजीव आणि मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर यांची गोड जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. निसर्गाच्या कुशीत मनमुराद आनंद लुटत, एका सुंदर प्रवासात सायली आणि सिद्धार्थ प्रेमात पडताना दिसत आहेत. काय बरं नेमकं चाललं असेल? तर ‘ओले आले’ या आगामी चित्रपटात सायली आणि सिद्धार्थ ही युथफुल जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दोन विरुद्ध स्वभावाच्या तरीही एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या या जोडीचा धम्माल प्रवास प्रेक्षकांना नवीन वर्षात 5 जानेवारी पासून चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

‘एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. संपूर्ण परिवारासाठी निखळ मनोरंजन हा या चित्रपटाचा गाभा असून नानांसोबत मकरंद अनासपुरे, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांच्या संगीताची जादू आता मराठीतही ऐकायला मिळणार आहे. ‘ओले आले’ या मराठी चित्रपटाद्वारे ते प्रथमच मराठी प्रेक्षकांच्या मनावर गरुड घालायला सज्ज आहेत. मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या या गाण्याला रोहित राऊत यांचा स्वरसाज लाभला आहे.

हे सुद्धा वाचा

सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री पहिल्यांदाच प्रेक्षकांना या चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. याआधी दोघांनी ‘झिम्मा 1’ आणि ‘झिम्मा 2’ या दोन्ही चित्रपटात एकत्र काम केलं होतं. सिद्धार्थ आणि सायलीने सोशल मीडियावर या चित्रपटाचं प्रमोशन करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासूनच या दोघांच्या जोडीची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे. यामध्ये नाना पाटेकरांची काय भूमिका असेल, याविषयीही कुतुहल निर्माण झालं आहे. सायली संजीवने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नानांसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.