Scam 2003 The Telgi Story | खेल बडा था, और खिलाडी..! भारतातील सर्वांत मोठ्या घोटाळ्याची कहाणी; पहा टीझर

कर्नाटकातील खानापूर इथं जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगीचा फळविक्रेत्यापासून ते सर्वांत मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड बनण्यापर्यंतचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. तेलगी स्टँप घोटाळ्याने संपूर्ण देश हादरलं होतं.

Scam 2003 The Telgi Story | खेल बडा था, और खिलाडी..! भारतातील सर्वांत मोठ्या घोटाळ्याची कहाणी; पहा टीझर
Scam 2003, The Telgi StoryImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 10:31 AM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ या वेब सीरिजने 2020 मध्ये धुमाकूळ घातला होता. प्रतीक गांधीची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये ‘बिग बुल’ हर्षद मेहताची कथा दाखवण्यात आली होती आणि त्याला जगभरातून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता तीन वर्षांनंतर हंसल मेहता एका नव्या स्कॅमची कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ या आगामी सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अब्दुल करीम तेलगी याच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे. तेलगीने तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा स्टँप पेपर घोटाळा केला होता.

1 मिनिट 26 सेकंदांचा हा टीझर पहिल्या क्षणापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. मनोज वाजपेयी यांच्या दमदार व्हॉइस ओव्हरने या टीझरची सुरुवात होते. त्यात अब्दुल करीम तेलगीने कशा पद्धतीने खोटेपणा आणि फसवणुकीच्या जोरावर त्याचं साम्राज्य निर्माण केलं, याची झलक पहायला मिळते. “मुझे पैसे कमाने का कोई शौक नहीं है. क्यूंकी पैसा कमाया नहीं बनाया जाता है”, हा तेलगीच्या तोंडातील संवाद त्याच्या फसवणुकीच्या फंड्याला उघड करतो.

कर्नाटकातील खानापूर इथं जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगीचा फळविक्रेत्यापासून ते सर्वांत मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड बनण्यापर्यंतचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. तेलगी स्टँप घोटाळ्याने संपूर्ण देश हादरलं होतं. तेलगीने देशातील 12 राज्यांमध्ये 176 कार्यालयांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचं बनावट स्टँप विक्रीचं साम्राज्य राजरोस उभं केलं होतं.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर-

हा टीझर प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ‘आणखी एक दमदार सीरिज’, असं एकाने लिहिलं. तर ‘आता फक्त सप्टेंबरची प्रतीक्षा आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ ही वेब सीरिज 2 सप्टेंबर रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तेलगी स्टँप घोटाळ्याचा छडा लावणारे पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकावर सीरिजची कथा आधारित आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

तेलगी घोटाळा-

अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या भावांनी नाशिकच्या प्रींटिंग प्रेसमधून जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक छापले होते. हे बनावट स्टँप देशभरात विकून त्याने कोट्यवधी रुपये जमवल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2003 मध्ये तेलगीला अटक करण्यात आली होती. 20 हजार कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात तेलगीला 2007 मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला 30 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इतकंच नाही तर त्याच्यावर 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 2017 मध्ये त्याचा बेंगळुरुतील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.