Video : उर्फी जावेद आणि राज कुंद्रा बहीण भाऊ? चर्चांना उधाण, अभिनेत्रीने झाकले चक्क जाळीने अंग
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद अनेकदा तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात सापडते. उर्फी जावेद नेहमीच सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिची मोठी फॅन फाॅलोइंग आहे.
मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख नक्कीच मिळवलीये. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण हे गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. लोक उर्फी जावेद हिच्यावर सतत तिच्या कपड्यांमुळे टिका करताना दिसतात. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच अंदाजा हा लावला जाऊ शकत नाही. उर्फी जावेद नेहमीच अतरंगी स्टाईलमध्ये दिसते.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा केला. उर्फी जावेद हिने सांगितले की, तिचे वडील कायमच तिला मारहाण करायचे. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा ती बेशुद्ध देखील व्हायची. मात्र, तिला सतत मारले जायचे. उर्फी जावेद हिने काही वर्षांपूर्वीच अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मुंबई गाठली. मात्र, मुंबईमध्ये आल्यानंतर उर्फी जावेद हिला मोठा संघर्ष करावा लागला.
उर्फी जावेद ही आज कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. एका महिन्याला उर्फी जावेद ही 10 ते 20 कोटींची कमाई करत असे सांगितले जाते. उर्फी जावेद कायमच तिच्या लूकमुळे जोरदार चर्चेत असते. नुकताच उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.
View this post on Instagram
उर्फी जावेद हिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून लोकांना थेट राज कुंद्रा याची आठवण आल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर अनेकांनी थेट उर्फी जावेद हिला राज कुंद्राची बहीणच म्हटले आहे. लाल रंगाच्या कपड्यांमध्ये या लूकमध्ये उर्फी जावेद ही दिसत आहे.
व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने लाल रंगाचा बोल्ड आउटफिट घातला आहे. त्याचबरोबर उर्फी जावेद हिने आपला संपूर्ण चेहरा लाल रंगाच्या कपड्याने झाकून घेतला आहे. व्हिडीओसोबत या लूकमधील काही खास फोटोही उर्फी जावेद हिने शेअर केल्याचे दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, उर्फी जावेद तू देखील राज कुंद्रा याच्यासारखे चुकीचे काम केले? दुसऱ्याने लिहिले की, उर्फी जावेद आणि राज कुंद्रा भाऊ बहीण आहेत. तिसऱ्याने लिहिले की, मला उर्फी जावेद हिचा आजचा लूक पाहून राज कुंद्राचीच आठवण येत आहे. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.