नातं तुटल्यानंतरही पूर्व सुनेकडून खान कुटुंबाचं कौतुक; म्हणाली “संकटाच्या वेळी ते..”

अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या वडिलांना गमावल्यानंतर संपूर्ण खान कुटुंब तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना सोहैल खानच्या पूर्वी पत्नीने खान कुटुंबाचं तोंडभरून कौतुक केलं. कोणतंही संकट आलं तर ते खंबीरपणे पाठिशी उभे राहतात, असं ती म्हणाली.

नातं तुटल्यानंतरही पूर्व सुनेकडून खान कुटुंबाचं कौतुक; म्हणाली संकटाच्या वेळी ते..
Salman Khan and Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 8:17 AM

अभिनेत्री मलायका अरोराने गेल्या महिन्यात तिच्या वडिलांना गमावलं होतं. मलायकाचे वडील अनिल मेहता यांनी इमारतीवरून उडी मारून स्वत:चा जीव संपवला होता. या कठीण काळात मलायकाचा पूर्व पती अरबाज खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब मलायकाच्या पाठिशी खंबीरपणे उभं होतं. खान कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता. इतकंच काय तर अभिनेता सलमान खानसुद्धा मलायकाच्या भेटीला पोहोचला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, खान कुटुंबाची पूर्व सून आणि सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेहने यावर प्रतिक्रिया दिली आहे. कठीण काळात ज्याप्रकारे खान कुटुंब मलायकासोबत उभं होतं, त्याचं तिने तोंडभरून कौतुक केलं आहे. सीमा आणि सोहैल यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. तर मलायका आणि अरबाजसुद्धा काही वर्षांपूर्वी विभक्त झाले.

मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर खान कुटुंबाने तिची ज्याप्रकारे साथ दिली, त्याविषयी बोलताना सीमा म्हणाली, “ते एखाद्या खडकासारखे खंबीर आहेत. जेव्हा एखादं संकट येतं किंवा तुम्हाला कोणतीही गरज असेल तेव्हा ते सर्वजण तुमच्या पाठिशी उभे राहतील. त्यांचा हाच गुण त्यांना एक कुटुंब म्हणून खास बनवतं.” सीमासुद्धा मलायकाचं सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी पोहोचली होती. अरबाज खान सर्वांत आधी मलायकाच्या भेटीला पोहोचला होता. त्याचंही नेटकऱ्यांनी कौतुक केलं होतं. अरबाजसोबतच त्याची पत्नी शुरा खान, सोहैल, सलमान, सलीम खान, सलमा खान, हेलन, अर्पिता खान, अलविरा अग्निहोत्री हे सर्वजण मलायका आणि तिच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते.

हे सुद्धा वाचा

मलायका आणि अरबाज खान यांनी 1997 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं. तर मलायका गेल्या काही वर्षांपासून अभिनेते अर्जुन कपूरला डेट करत होती. मात्र काही दिवसांपूर्वीच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं कळतंय. तर दुसरीकडे सीमा आणि सोहैल हे 2020 मध्ये विभक्त झाले. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर सीमा विक्रम अहुजाला डेट करतेय. 1990 मध्ये सीमाचा विक्रमसोबत साखरपुडा झाला होता. मात्र सोहैल खानशी पळून लग्न करण्यासाठी तिने हा साखरपुडा मोडला होता. आता त्याच विक्रमसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.