खान कुटुंबातील सुना आणि घटस्फोट, ‘खान नावाचा वापर केला आणि…’
Khan Family: सोहैल खान - सीमा सजदेह यांच्या घटस्फोटानंतर रंगल्या अनेक चर्चा, खान कुटुंबातील सुना, त्यांचं आयुष्य आणि घटस्फोट..., खान कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...
Khan Family: अभिनेता सोहैल खान याची पहिली पत्नी सीमा सजदेह गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोहैल याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सीमा सजदेह हिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. सीमा आता विक्रम आहुजा याला डेट करत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय सीमा आणि विक्रम लिव्ह इनमध्ये असल्याची माहिती देखील समोर येत आहे. एका शोमध्ये सीमाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.
सीमा सजदेह आणि सोहैल खान
सीमा आणि सोहैल यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर सर्वांना धक्का बसला. पण घटस्फोट होण्याआधीच दोघे विभक्त झाले होते. फक्त दोघांच्या घटस्पोटाला कायदेशीर कागदपत्रांची गरज होती. आम्ही एकमेकांसोबत एका घरात राहणं देखील बंद केलं होतं.
View this post on Instagram
घटस्फोटानंतर सीमा हिच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. ज्यावर तिने स्पष्ट भूमिका मांडली होती. ‘सीमाने फक्त खान नावाचा वापर करण्यासाठी सोहैलसोबत लग्न केलं… असं देखील अनेक जण मला म्हणाले. नावाची गरज संपली आणि कुटुंबाला सोडलं… अशा चर्चा माझ्याबद्दल रंगू लागल्या होत्या.’
View this post on Instagram
‘आपण अशा समाजात राहतो, जेथे घटस्फोट कलंक मानला जातो. मी कायम वाईट कमेंट वाचल्या ऐकल्या आहेत. मी आणि सोहैल फार पूर्वी विभक्त झालो होतो. पण लोकांना वाटायचं आम्ही एकत्र आहोत. माझा मुलगा निर्वाण अशा वयात होता, जेव्हा त्याला आई – वडील दोघांची गरज होती.’
‘माझं वैवाहिक आयुष्य आणि माझा मुलगा… दोघांमध्ये मला एकाची निवड करायची होती. आमची कायम भांडणं व्हायची आणि त्याचा वाईट परिणाम मुलांवर होताना मला दिसत होतं. त्यामुळे घटस्फोट गरजेचा होता.’ असं देखील सीमा एका मुलाखतीत म्हणाली होती.