संपत्ती, प्रसिद्धी असूनही Akshay Kumar ला ‘या’ गोष्टीची खंत; म्हणतो, ‘असं माझ्यासोबत पहिल्यांदा…’
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि कोट्यवधींची संपत्ती असूनही अक्षय कुमार याला करावा लागतोय 'या' गोष्टीचा सामना..., अनेक वर्षांनंतर अभिनेता व्यक्त झालाच
Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यावर सक्रिय असलेला खिलाडी कुमार कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकताच अभिनेत्याचा ‘सेल्फी’ सिनेमा प्रदर्शित झाला. पण अक्षय याचा ‘सेल्फी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. सिनेमाने अपयशी ठरल्यानंतर अक्षय कुमार याने स्वतःच्या सिनेमांबाबत केलेलं मोठं वक्तव्य समोर येत आहे. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे. सिनेमांमध्ये मिळत असलेल्या अपयशाबद्दल अभिनेता म्हणाला, ‘असं माझ्यासोबत पहिल्यांदा झालेलं नाही…’ शिवाय यावेळी अभिनेत्याने मुलाखतीत प्रेक्षकांचे विचार आणि स्वतःच्या विचारांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. (Akshay Kumar in bollywood)
सिनेमांना मिळत असलेल्या अपयशाला स्वतःला जबाबदार ठरवत अक्षय कुमार म्हणाला, ‘असं माझ्यासोबत पहिल्यांदा झालेलं नाही. जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा माझे १६ सिनेमे फ्लॉप गेले. त्यानंतर आठ सिनेमे फ्लॉप ठरले.’ पुढे अभिनेता म्हणाला, ‘क्रिकेटर रोज सेंचुरी करत नाही… प्रेक्षकांना नक्की काय हवं आहे, हे मला कळत नसावं म्हणून माझे सिनेमे अपयशी ठरत असतील…’ अशी खंत अभिनेत्याने व्यक्त केलं आहे. (Akshay Kumar on film)
एवढंच नाही तर ॲक्शन सिनेमांबद्दल देखील अभिनेत्याने स्वतःचं मत व्यक्त केलं. ‘वेगळे सिनेमे करण्याकडे माझा कल होता. कारण एकच गोष्ट कितीदा करणार. जर प्रेक्षकांना ॲक्शन आवडत आहे, तर पुन्हा ॲक्शन सिनेमांमध्ये काम नक्की करेल…मी बदलावं असं प्रेक्षकांना वाटत असेल, तर नक्की बदलण्याचा प्रयत्न करेल…’ असं देखील अभिनेता म्हणाला. सध्या अभिनेत्याचं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.
नुकताच अक्षय कुमार याचा ‘सेल्फी’ (selfiee) सिनेमा प्रदर्शित झाला. खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट 2023 मधील पहिला रिलीज झालेला चित्रपट (Movie) आहे. अक्षय कुमार याच्यासाठी 2022 हे वर्ष काही खास गेले नाही. पण नव्या वर्षातील पहिला सिनेमा देखील अपयशी ठरल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत.
सांगायचं झालं तर, ‘सेल्फी’ सिनेमा मल्याळम सिनेमा ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा हिंदी रिमेक आहे. पृथ्वीराज आणि सूरज वेंजारामूडू यांनी ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. तर सिनेमाचा रिमेक ‘सेल्फी’ मध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत चाहत्यांच्या भेटीस आले. आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा किती रुपयांचा गल्ला जमा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (akshay kumar movies latest)