Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Selfiee Review | ‘असे चित्रपट करू नकोस’, अक्षय कुमारवर चाहते नाराज; ‘सेल्फी’ पाहण्याआधी वाचा हे ट्विट्स

काही नेटकऱ्यांनी असंही म्हटलंय की यापेक्षा एखादा साऊथचा चित्रपट ओटीटीवर पाहून घ्या. अक्षय कुमारचे चाहते त्याच्या चित्रपट निवडीवर नाराज झाले आहेत. तुम्ही जर थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आधी 'सेल्फी'चा ट्विटर रिव्ह्यू काय म्हणतोय, ते जाणून घ्या..

Selfiee Review | 'असे चित्रपट करू नकोस', अक्षय कुमारवर चाहते नाराज; 'सेल्फी' पाहण्याआधी वाचा हे ट्विट्स
Selfiee Movie Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 1:42 PM

मुंबई : अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. राज मेहता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ट्विटरवर अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. काही नेटकऱ्यांनी असंही म्हटलंय की यापेक्षा एखादा साऊथचा चित्रपट ओटीटीवर पाहून घ्या. अक्षय कुमारचे चाहते त्याच्या चित्रपट निवडीवर नाराज झाले आहेत. तुम्ही जर थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आधी ‘सेल्फी’चा ट्विटर रिव्ह्यू काय म्हणतोय, ते जाणून घ्या..

सेल्फी हा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या कॉमेडी ड्रामाची निर्मिती करण जोहरने केली आहे. या चित्रपटात अक्षयने एका सुपरस्टारची भूमिका साकारली आहे. या सुपरस्टारसोबत एक सेल्फी क्लिक करण्याची विनंती त्याचा चाहता करतो, मात्र त्यादरम्यान असं काही घडतं, ज्यामुळे सगळा गोंधळ उडतो. यात नंतर मीडियासुद्धा सहभागी होते आणि हा लढा एक सुपरस्टार विरुद्ध चाहता असा होतो. सेल्फी हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक असला तरी हा ‘फ्रेम बाय फ्रेम’ कॉपी केलेला नाही.

हे सुद्धा वाचा

‘सेल्फी’ची ट्विटर रेटिंग-

एका शब्दांत रिव्हयू

‘पैसे वाया घालवू नका’

वाईट रिमेक

गेल्या वर्षांत अक्षयचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र यापैकी एकाही चित्रपटाने विशेष कमाई केली नाही. रक्षा बंधन, राम सेतू, बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. तर कटपुतली हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.