रणबीरच्या ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारण्यास अनेकांचा नकार; अखेर कोणाची झाली निवड?

‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळतंय. चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे.

रणबीरच्या 'रामायण'मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारण्यास अनेकांचा नकार; अखेर कोणाची झाली निवड?
Ranbir Kapoor Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 11:55 AM

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर हा श्रीरामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून काही महिन्यांपूर्वी सेटवरील फोटोसुद्धा लीक झाले होते. रामाच्या भूमिकेसाठी रणबीरलाच का निवडलं, असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले होते. काहींनी त्यावरून आक्षेपसुद्धा केला होता. आता कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाने कलाकारांच्या निवडीबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. “हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना समजेल की रणबीरपेक्षा दुसरा कोणताच अभिनेता या मोठ्या भूमिकेसाठी परफेक्ट निवड ठरला नसता”, असं त्याने म्हटलंय. विशेष म्हणजे लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध घेणं जास्त आव्हानात्मक ठरल्याचं मुकेशने सांगितलंय. कारण नामांकित कलाकार लक्ष्मणाची भूमिका स्वीकारण्यास तयार नव्हते. रणबीर मुख्य अभिनेता असताना त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची भूमिका त्यांना साकारायची नव्हती, असं मुकेशने स्पष्ट केलंय. अखेर या भूमिकेसाठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील नवोदित अभिनेत्याची निवड केल्याचा खुलासा मुकेशने केला आहे.

रणबीरची निवड परफेक्ट का?

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्ट मुलाखतीत मुकेश म्हणाला, “रामायण या चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळातच नितेश भाईंनी रणबीरची निवड केली होती. तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर समजेल की ही निवड इतकी परफेक्ट का आहे? माझ्या करिअरमध्ये मी रणबीर आणि राजकुमार राव यांच्यासोबत सर्वाधिक काम केलंय. अभिनयाच्या बाबतीत रणबीरला कोणीच मात देऊ शकत नाही. रणबीरला चित्रपट हिट झाला की फ्लॉप याने फरक पडत नाही. त्याला फक्त त्याच्या अभिनयाची काळजी असते. त्याला प्रमोशन करणंही फारसं आवडत नाही. तो फक्त अभिनयावर लक्ष केंद्रीत करतो. मी त्याला खूप जवळून पाहिलं आहे. रॉकस्टार, तमाशा, संजू, बॉम्बे वेल्वेटमध्ये मी त्याचं काम पाहिलंय. त्याचं अभिनय अत्यंत सहज असतं.”

लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी कोणाची निवड?

मुकेशने या मुलाखतीत चित्रपटातील इतरही कलाकारांविषयी खुलासा केला आहे. हनुमानाच्या भूमिकेसाठी मोठ्या कलाकाराची निवड केल्याचं त्याने सांगितलंय. तर लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी नवोदित अभिनेता निवडला आहे. “लक्ष्मणाच्या भूमिकेसाठीही आम्हाला खूप चांगला अभिनेता भेटला आहे. अनेकांनी या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. पण ज्या अभिनेत्याची निवड आम्ही केली, ती खूप चांगली निवड आहे. त्याचा बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट आहे”, असं त्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

“आम्ही सर्वांत शेवटी लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड केली. यासाठी आम्ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीत बरंच काम केलेल्या तरुण अभिनेत्याला निवडलंय. तो खूप चांगला कलाकार आहे. लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी त्याच्यापेक्षा चांगला अभिनेता आम्हाला भेटला नसता. ज्या कलाकारांना आम्ही याआधी विचारलं होतं, त्यांनी नकार दिल्याचं मला खूप समाधान आहे. दोन-तीन जणांनी या भूमिकेसाठी नकार दिला होता”, असं त्याने स्पष्ट केलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.