11 वर्षांच्या अबरामसाठी शाहरुखने घेतलं भारतातील सर्वात महागडं गिफ्ट; खर्च केले कोट्यावधी रुपये

शाहरुख खानने आपल्या धाकट्या लेकासाठी अबरामसाठी 3 कोटी रुपयांची महागडी भेट दिली आहे. ही वस्तू भारतातील सर्वात महागडं गिफ्ट आहे.

11 वर्षांच्या अबरामसाठी शाहरुखने घेतलं भारतातील सर्वात महागडं गिफ्ट; खर्च केले कोट्यावधी रुपये
Shah Rukh bought a MPV car worth crores for Abram
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 5:33 PM

बॉलिवूडमधला ‘किंग खान’ म्हणजे शाहरूख खान खऱ्या आयुष्यातही किंगच आहे. आताच शाहरुखने त्याचा वाढदिवस साजरा केला. शाहरूखने त्याचा वाढदिवस त्याच्या पत्नि अन् मुलांसोबत तसेच काही जवळच्याच लोकांसोबत साजरा केला. किंग खान आपल्या मुलांवर किती प्रेम करतो हे सर्वांनाच माहित आहे. याचीच झलक नुकतीच पाहायला मिळाली. शाहरूखने त्याच्या धाकट्या लेकासाठी जगातील सर्वात महागडं गिफ्ट घेतलं आहे.

धाकट्या लेकासाठी शाहरूखकडून कोट्यावधींचे गिफ्ट

शाहरुख खान नाही म्हटलं तरी 7000 कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे. भव्य घरापासून ते लक्झरी कारपर्यंत सर्वच चैनीच्या वस्तू त्याच्याकडे आहेत. मुळात म्हणजे या सर्व गोष्टींचा उपभोग घ्यायला आणि किंगसारखे राहायला त्याला मनापासून आवडतात हे त्याने कित्येक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याचीच एक झलक म्हणजे त्याने आपला लेक अबरामसाठी कोट्यावधींचे गिफ्ट घेतले आहे.

शाहरूखने एक अलिशान कार खरेदी केली आहे. अबरामसाठी घेतलेली ही गाडी भारतातील सर्वात महाग एमपीव्ही कार आहे.या गाडीची किंमत जवळपास 3 कोटी रुपये आहे. शाहरुखच्या या महागड्या गाडीची निवड त्याचे मुलांवरील प्रेम तर दर्शवतच पण सोबतच लक्झरी गाड्यांबद्दलचं प्रेमही दाखवतं.

शाहरुखकडे आहेत जगातील सर्वात महागड्या कार 

शाहरुख खानच्या कारचं कलेक्शन 31 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यात जगातील काही प्रसिद्ध वाहनांचा समावेश आहे. शाहरुखच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये बुगाटी वेरॉन, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, बीएमडब्ल्यू, ऑडी ए6 आणि रोल्स रॉयस, फँटम कूपर सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत.

शाहरुखकडे असलेल्या सर्वात महागड्या कारपैकी एक म्हणजे रोल्स-रॉइस कलिनन, जी जगभरात अतिशय महाग आणि अलिशान कार मानली जाते. शाहरुखच्या दोन्ही मुलांकडे अतिशय महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. आता त्यात अबरामचीही भर पडली आहे. शाहरुखची तिन्ही मुलंही या चैनीचा आनंद घेत आहेत.

शाहरुख खानचा छोटा अबराम खान नेहमीच त्याच्या शांत आणि हसऱ्या चेहऱ्याने, स्वभावाने साऱ्यांची मनं जिंकत असतो. पापाराजींशीही तो नेहमी आपुलकीने वागताना आणि बोलताना दिसतो. त्यामुळे नेटकऱ्यांकडूनही त्याला नेहमीच प्रेम मिळत असतं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.