Shah Rukh Aryan Khan | शाहरुख खान आणि आर्यन पहिल्यांदाच दिसणार एकत्र, बाप लेकाची जोडी करणार धमाल?
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. शाहरुख खान याने पठाणनंतर लगेचच त्याच्या आगामी डंकी आणि जवान चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात केलीये. आर्यन खान हा देखील लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहरुख खान याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या मुंबईतील मन्नत बंगल्याच्या बाहेर दरवर्षी चाहते मोठी गर्दी करतात. आपल्या आवडत्या स्टारची फक्त एक झलक बघण्यासाठी 1000 किलो मीटरचा प्रवास करत हे चाहते मुंबईत (Mumbai) दाखल होतात. एक मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये शाहरुख खान याच्याबद्दल नक्कीच आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने कमाईमध्ये धमाका केला आणि हा चित्रपट (Movie) शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय.
विशेष म्हणजे शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. पठाण चित्रपटानंतर लगेचच शाहरुख खान याने त्याच्या आगामी डंकी आणि जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. पठाण चित्रपटात चाहत्यांना डबल धमाका हा बघण्यास मिळाला. फक्त शाहरुख खान हाच नाही तर सलमान खान याचीही झलक या चित्रपटात बघायला मिळाली.
शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हा देखील लवकरच बाॅलिवूडमध्ये दणदणीत असे पुनरागमन करणार आहे. त्याच्या आगामी वेब सीरिजची शूटिंगही सुरू करण्यात आलीये. करण जोहर याचा शो कॉफी विथ करण 8 ची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. कॉफी विथ करण 7 च्या सीजनमध्ये शाहरुख खान याने शोला हजेरी लावली नसल्याचे चाहते नाराज झाल्याचे बघायला मिळाले होते.
नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार कॉफी विथ करण 8 मध्ये फक्त शाहरुख खान हाच नाही तर आर्यन खान हा देखील सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांच बाप लेकाची जोडी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. यामुळे चाहते आता करण जोहर याच्या शोची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. आर्यन आणि शाहरुख खान यांचे रिलेशन नेमके कसे आहे हे देखील शोमध्ये बघायला मिळेल.
करण जोहर याच्या कॉफी विथ करण शोमध्ये अनेक बाॅलिवूड स्टार हजेरी लावतात. यामध्ये ते त्यांच्या पर्सनल लाईफ आणि करिअरबद्दल बोलताना देखील दिसतात. विशेष म्हणजे आतापर्यंत या शोला मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. आर्यन खान याने अजून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले नाहीये. मात्र, असे असताना देखील आर्यन खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.